Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

नागरिकांनो सावधान ! 9 एप्रिल ते 11 एप्रिल ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाचा गंभीर इशारा

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणात गेल्या महिन्यात पावसाने अक्षरशा थैमान वाजवलं होतं.

Maharashtra Weather Update : गेल्या महिन्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ तसेच कोकणात गेल्या महिन्यात पावसाने अक्षरशा थैमान वाजवलं होतं. यामुळे रब्बी हंगामातील काढणीयोग्य पिकांचे मोठे नुकसान झाले. फळ पिकांचे देखील मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. दरम्यान एप्रिल महिन्यातील सुरुवातीला तापमानात मोठी वाढ झाली होती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे आता अवकाळी पावसाने पिच्छा सोडला म्हणून शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र एप्रिल महिन्यातील सुरुवातीचे तीन चार दिवस वगळले तर राज्यात पुन्हा ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा धडधड वाढली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे आणि अवकाळी पाऊस पडत आहे.

हे पण वाचा :- वंदे भारत ट्रेन नंतर आता शिर्डी जाणाऱ्या भाविकांना आणखी एक मोठं गिफ्ट मिळणार ! आता शिर्डीचा प्रवास होणार सोपा, पहा….

दरम्यान आता 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 एप्रिल, 10 एप्रिल आणि 11 एप्रिल रोजी राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीमध्ये राज्यातील काही भागात गारपिट देखील होईल असा अंदाज आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत, यामुळे काही जिल्ह्यात जीवितहानी देखील झाली आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

हे पण वाचा :- दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! या विभागात निघाली मोठी भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

हवामान विभागाने दिलेल्या महत्वपूर्ण माहितीनुसार, 8 व 9 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच 10 एप्रिल आणि 11 एप्रिल रोजी राज्यातील काही विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

एकंदरीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी अधिक सजग राहणे गरजेचे आहे. विशेष बाब म्हणजे या कालावधीमध्ये राज्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची तसेच पशुधनाची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.

हे पण वाचा :- शिंदे सरकार ‘या’ एका कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करणार, पहा….