Shirdi News : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र साईनगरी शिर्डी येथे नेहमीच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळते. साईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी जगप्रसिद्ध सेलिब्रिटी साईनगरीत हजेरी लावत असतात. नुकतीच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी सुद्धा प्रदीर्घ कालावधीनंतर साईनगरी शिर्डीला भेट दिली आहे.
त्यांची साईबाबांच्या चरणी लीन होण्याची गेल्या काही वर्षांची इच्छा काल पूर्ण झाली आहे. गायक सुरेश वाडकर यांनी काल अर्थातच 25 फेब्रुवारी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले आहे.

खरे तर अनेक वर्षांनी वाडकर यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यामुळे दर्शनानंतर त्यांना रडायला आले होते. विशेष म्हणजे वाडकर यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत साईनगरीत येऊन साईनाथाचे दर्शन घेतले आहे.
दरम्यान साई संस्थानाने यावेळी वाडकर यांचा सत्कार केला होता. दर्शन झाल्यानंतर सुप्रसिद्ध गायक वाडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आईची साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची प्रखर इच्छा होती.
यामुळे आज आम्ही बाबांच्या चरणी लीन झालोत. यावेळी त्यांनी 1967 पासून मी साईबाबांच्या दर्शनाला येत असल्याचे म्हटले आहे.
तसेच त्यांनी मी साईबाबांकडे काहीच मागणे मागत नाही, कारण की बाबा काहीही न मागता सारं काही देतात असे देखील सांगितले.
पीएम मोदींबाबत काय म्हटलेत
साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी आल्यानंतर सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांना प्रसारमाध्यमांनी काही राजनैतिक प्रश्न देखील विचारलेत. शिवाय सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या घडामोडींबाबत देखील वाळकर यांचे मत जाणून घेतले.
दरम्यान यावर वाडकर यांनी राजकारणातलं मला काही माहीत नाही, मी गाणं वाजवणारा माणूस आहे असे म्हटले. परंतु त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठे भाष्य केले आहे.
खरे तर त्यांना मराठा आरक्षणाबाबत सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींबाबत प्रश्न विचारला गेला होता. या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी साईबाबांनीच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवल आहे.
तसेच मोदींजी आता सर्वकाही व्यवस्थित करणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. सर्व देवी देवतांनी आणि साईबाबांनी नरेंद्र मोदी यांची नेमणूक केली आहे आणि ही नेमणूक फक्त चांगले करण्यासाठी केली गेली आहे, असे यावेळी वाडकर यांनी म्हटले आहे.













