गुढीपाडव्याच्या दिवशी साई संस्थानचा मोठा निर्णय ! शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांना मिळणार 5 लाखांचे विमा संरक्षण

साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता साई संस्थानने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. आता साईनगर शिर्डीत दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

Published on -

Shirdi News : साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरे तर आज संपूर्ण राज्यभर गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. दरम्यान गुढीपाडव्याच्या या शुभमुहूर्तावर संपूर्ण देशातील साई भक्तांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.

दरवर्षी साईनगरी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोच्या घरात असते. मात्र दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साईसंस्थांनच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

साईनगरी शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांना आता पाच लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान जे लोक घरातून निघाल्यानंतर संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करतील त्यांना आता घरातून निघाल्यानंतर ते साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडल्यास पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे.

संबंधित अपगातग्रस्त साईभक्ताला किंवा त्याच्या कुटुंबियांना हा विमा मिळणार आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांचा अनेकदा अपघात होतो आणि याच पार्श्वभूमीवर साई संस्थानने हा मोठा निर्णय घेतला आहे.

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, जो भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येईल, त्याच्यासाठी 5 लाख रुपयांचा विमा उतरवण्यात येणार आहे. मात्र, यासाठी एक अट घालण्यात आली असून, भक्तांनी दर्शनाला निघण्यापूर्वी साईबाबा संस्थानच्या ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

या नोंदणीमुळे संबंधित व्यक्ती प्रत्यक्ष साईबाबांच्या दर्शनासाठीच आलेली आहे, याची ओळख पटू शकते. केवळ नोंदणी केलेल्या भक्तांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे.

सर्व साई भक्तांनी निघण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित आणि विनाअडथळा दर्शनाचा अनुभव घेता येईल. साई संस्थानचा हा निर्णय भक्तांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe