Shirdi Tirupati Railway : रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन. रेल्वेने देशातील अनेक तीर्थक्षेत्र कनेक्ट झाली आहेत. दरम्यान आता देशातील दोन महत्त्वाचे तीर्थक्षेत्र एकमेकांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने साईनगरी शिर्डी आणि तिरुपती बालाजी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही तीर्थक्षेत्रांना जोडणारी नवीन रेल्वेगाडी आजपासून प्रत्यक्षात सुरू करण्याचा मोठा निर्णय झालाय.

आज दहा डिसेंबर 2025 पासून शिर्डी – तिरुपती एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. आज या एक्सप्रेस ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
खरे तर शिर्डी तिरुपती एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून उपस्थित केली जात होती आणि आज अखेर ही मागणी पूर्ण झाली आहे.
यामुळे शिर्डी तिरुपती हा प्रवास वेगवान होणार आहे. या रेल्वे गाडीचा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगाना आणि महाराष्ट्र या चार राज्यांमधील भाविकांना मोठा फायदा होणार आहे. तिरुपती आणि शिर्डी दरम्यान सुरू झालेली ही ट्रेन पहिली थेट रेल्वे सेवा राहणार आहे.
या गाडीमुळे शिर्डीहून तिरुपतीला आणि तिरुपतीहून शिर्डीला जाणे सोपे होईल. या नव्या रेल्वे गाडीमुळे शिर्डी ते तिरुपती हा प्रवास तीस तासांमध्ये पूर्ण होणार अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
आज पासून सुरू झालेली ही रेल्वे गाडी आठवड्यातून एकदा धावणार आहे म्हणजेच एक साप्ताहिक गाडी राहणार असून या गाडीला महाराष्ट्रातील तब्बल 11 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
या गाडीमुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. आता आपण ही गाडी राज्यातील कोणकोणत्या स्थानावर थांबा घेणार याची माहिती पाहूयात.
या Railway Station वर थांबा मंजूर
शिर्डी – तिरुपती एक्सप्रेस 31 रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकरा महत्वच्या स्थानकांचा समावेश आहे.
शिर्डी, कोपरगाव, मनमाड, नागरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, सेलू, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड आणि उदगीर या राज्यातील महत्त्वाच्या स्थानकावर ही गाडी थांबा घेणार अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.













