SIP Investment : फक्त 24 वर्षांत व्हा करोडपती; ‘हा’ आहे सर्वात सोप्पा मार्ग

Published on -

SIP Investment: तुम्हाला आम्हाला सर्वांनात आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक सरकारी किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये पेन्शन मिळत नसल्याने, अनेकजण उतारवयाची गुंतवणूक करण्यावर भर देताना दिसत आहेत. फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट हे गुंतवणुकीचे पर्याय आहेत परंतु त्यातल्या त्यात म्युच्युअल फंडाच्या SIP पर्यायाकडे अनेकजण वळत आहेत. SIP मधून मिळणारा चांगला परतावा व कंपाउंडिंगचा फायदा असे दोन फायदे त्यातून मिळत आहे. आता याच पर्यायातून आपण करोडपती कसे होऊ शकतो, हे गणित आपण समजून घेऊ.

SIP म्हणजे नेमकं काय?

दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणे म्हणजे SIP होय. म्युच्युअल फंडामध्ये SIP करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाल मुळ गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही व्याज दिले जाते. व्याजावर व्याज मिळत असल्याने दिर्घकाळ गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होतो. FD किंवा RD च्या तुलनेत SIP मध्ये अंदाजे 12% ते 14% पर्यंत परतावा मिळतो.

SIP तून किती रिटर्न मिळतो?

– एसआयपीत वार्षिक साधारणतः 14 टक्के परतावा मिळतो. त्याच्या हिशोबाने तुम्ही जर 36 वर्षे 1000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्ही 4 लाख 32 हजार रुपये गुंतवता. परंतु याच रकमेवर तुम्हाला 14 टक्के दराने 97,74,079 रुपये व्याज मिळते. म्हणजेच तुम्हाला एकूण 1 कोटी 02 लाख 06 हजार 079 रुपये मिळतात.
– तुम्ही जर 31 वर्षे 2000 रुपये गुंतवणूक केली. तर तुम्ही 7 लाख 44 हजार रुपये गुंतवता. परंतु याच रकमेवर तुम्हाला 14 टक्के दराने 97,68,919 रुपये व्याज मिळते. म्हणजेच तुम्हाला एकूण 1 कोटी 05 लाख 06 हजार 919 रुपये मिळतात.
– तुम्ही जर 28 वर्षे 3000 रुपये गुंतवणूक केली, तर तुम्ही 10 लाख 08 हजार रुपये गुंतवता. परंतु याच रकमेवर तुम्हाला 14 टक्के दराने 95,46,091 रुपये व्याज मिळते. म्हणजेच तुम्हाला एकूण 1 कोटी 05 लाख 54 हजार 091 रुपये मिळतात.
– तुम्ही जर 24 वर्षे 5000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्ही 14 लाख 40 हजार रुपये गुंतवता. परंतु याच रकमेवर तुम्हाला 14 टक्के दराने 87,86,967 रुपये व्याज मिळते. म्हणजेच तुम्हाला एकूण 1 कोटी 02 लाख 06 हजार 967 रुपये मिळतात.

SIP करताना हे लक्षात ठेवा

मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून देशाच्या कोणत्याही भागातून SIP सुरू करता येते. Groww, Zerodha, PhonePe, Paytm Money, तसेच बँकांच्या अ‍ॅप्स यासाठी वापरता येतात. मात्र कोणता म्युच्युअल फंड निवडायचा हे जाणून घेण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घेणे शहाणपणाचे ठरते. एसआयपी करुन तुम्ही अगदी 24 ते 25 वर्षांत करोडपती होऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गरर्शकाची आवश्यकता असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!