छोट्या बचतीतून थेट 2 कोटींचा फंड! जाणून घ्या SIP चा 12x12x24 फॉर्म्युला

Published on -

SIP Investment Tips : आजही अनेक जण बचत म्हणजे बँकेतील एफडी, आरडी किंवा सरकारी योजनांपुरतीच मर्यादित ठेवतात. थोडे पैसे साठवले की समाधान मानले जाते. मात्र हीच छोटी बचत योग्य पद्धतीने आणि दीर्घकाळासाठी गुंतवली, तर त्यातून कोट्यवधी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो, हे फारच कमी लोकांना माहिती आहे.

म्युच्युअल फंडातील SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही अशीच एक प्रभावी गुंतवणूक पद्धत आहे. SIP म्हणजे ठराविक रक्कम दरमहा म्युच्युअल फंडात गुंतवणे. या माध्यमातून अॅसेट मॅनेजमेंट कंपन्या (AMC) तुमचे पैसे शेअर बाजार, बाँड्स आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवतात.

दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो. FD किंवा पारंपरिक बचत योजनांच्या तुलनेत SIP मधून जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

सध्या चर्चेत असलेला SIP चा 12x12x24 फॉर्म्युला खूपच सोपा आहे. समजा तुम्ही वयाच्या 24 व्या वर्षी SIP सुरू करता. दरमहा 12,000 रुपये गुंतवायचे, वार्षिक सरासरी 12 टक्के परताव्याचा अंदाज धरायचा आणि ही गुंतवणूक सलग 24 वर्षे चालू ठेवायची. म्हणजेच वयाच्या 48 व्या वर्षी तुमच्याकडे मोठा फंड तयार होतो.

या काळात तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 34.56 लाख रुपये इतकी होते. मात्र चक्रवाढ परताव्यामुळे या रकमेवर अंदाजे 1.66 कोटी रुपयांहून अधिक नफा मिळतो. गुंतवलेली रक्कम आणि नफा मिळून तुमचा एकूण फंड सुमारे 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतो.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा हिशोब फक्त 12 टक्के परताव्यावर आधारित आहे. दीर्घकाळात काही चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडांनी याहून जास्त परतावा दिला आहे.

अर्थात, बाजाराशी निगडीत जोखीम असते, त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती घेणे आणि गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लवकर सुरुवात, शिस्तबद्ध गुंतवणूक आणि संयम या तीन गोष्टी पाळल्या, तर SIP च्या माध्यमातून सामान्य उत्पन्न असलेली व्यक्तीदेखील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि कोट्यधीश होऊ शकते, हे नक्की.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe