एक कप चहाच्या खर्चात तुम्ही करोडपती बनाल ! दररोज 20 रुपये वाचवा अन एक कोटी रुपये कमवा, ‘हा’ आहे एकदम सोप्पा फॉर्म्युला !

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) च्या मदतीने तुम्ही दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकता. एस आय पी मध्ये तुम्ही किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. महिन्याला पाचशे-सहाशे रुपयांची गुंतवणूक करूनही तुम्हाला लाखो रुपयांचा फंड तयार करता येतो.

Tejas B Shelar
Published:

SIP Investment Tips : करोडपती होण्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते, असे अनेकांना वाटते. पण तुम्ही फक्त एक कप चहा एवढे म्हणजेच रोज 20 रुपये बचत करूनही करोडपती होऊ शकता. यासाठी तुम्हाला केवळ योग्य नियोजन आणि संयम आवश्यक आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) च्या मदतीने तुम्ही दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करू शकता.

एस आय पी मध्ये तुम्ही किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. महिन्याला पाचशे-सहाशे रुपयांची गुंतवणूक करूनही तुम्हाला लाखो रुपयांचा फंड तयार करता येतो. दरम्यान आज आपण एक कप चहा एवढे म्हणजेच 20 रुपये बचत करून कशा पद्धतीने एक कोटी रुपयांचा निधी तयार करता येऊ शकतो याबाबतचा आढावा घेणार आहोत.

कसा होईल करोडो रुपयांचा निधी तयार ?

जर तुम्ही दररोज फक्त 20 रुपये बाजूला ठेवले आणि दरमहा 600 रुपये एसआयपीमध्ये गुंतवले, तर दीर्घकालीन चक्रवाढ व्याजाच्या मदतीने मोठा निधी जमा होऊ शकतो. गृहीत धरा की तुम्ही 30 वर्षे ही बचत सुरू ठेवली आणि वार्षिक सरासरी 12% परतावा मिळाला, तर तुमच्या निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे 1 कोटींहून अधिक रक्कम असू शकते.

एक कोटी मिळवण्याचे सोपे कॅल्क्युलेशन

दररोजची बचत : 20 रुपये
मासिक गुंतवणूक : 600 रुपये
वार्षिक परतावा : 12% (अंदाजित)
गुंतवणूक कालावधी : 30 वर्षे
एकूण गुंतवणूक : 2,16,000 रुपये
संभाव्य निधी : 1.05 कोटी रुपये

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (SIP) का निवडावा?

एसआयपी ही एक शिस्तबद्ध आणि सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. यात तुम्ही प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता, ज्यामुळे मार्केटमधील चढ-उताराचा परिणाम कमी होतो. तसेच, चक्रवाढ व्याजाच्या मदतीने तुम्ही मोठ्या संपत्तीचे मालक बनू शकता.

नियमित बचतीचे फायदे

छोटी बचत मोठा फायदा देते. चक्रवाढ व्याजामुळे दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण होते. जोखीम कमी होते आणि बाजारातील अस्थिरतेचा परिणाम कमी होतो. आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास मदत होते. यात जर तुम्ही लवकर गुंतवणूक सुरू केली, तर त्याचा जास्त फायदा होईल.

म्हणूनच, आजपासूनच रोज 20 रुपये वाचवण्याची सवय लावा आणि करोडपती बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाका. तथापि, कुठेही गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये सुद्धा जोखीम असते यामुळे एसआयपी करण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe