SIP मधून लखपती होता येत ! 500 रुपयांची एसआयपी केल्यानंतर 5, 10, 15, अन 20 वर्षानंतर किती परतावा मिळणार ?

Tejas B Shelar
Published:

SIP Mutual Fund : भारतात आधी सुरक्षित गुंतवणुकीला विशेष महत्त्व दाखवले जात होते. सुरक्षित गुंतवणुकीसाठी भारतातील लोक बँकेच्या एफडी योजनेमध्ये आणि पोस्टाच्या बचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसत होते.

पण अलीकडे लोकांचा माईंडसेट चेंज झाला आहे आणि आता अधिकचा परतावा मिळावा म्हणून लोक शेअर मार्केटकडे वळू लागले आहेत. तसेच ज्या लोकांना शेअर मार्केटचे विशेष ज्ञान नाही ते लोक एसआयपी करत आहेत.

म्युच्युअल फंड एसआयपी मधील गुंतवणूक अलीकडील काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली असून भारतीयांना यातून चांगला परतावा सुद्धा मिळतोय. दरम्यान आज आपण पाचशे रुपयांची एसआयपी केल्यानंतर पाच, दहा, पंधरा आणि वीस वर्षानंतर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळू शकतो.

एस आय पी आपल्या गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने लखपती बनवते ? याचे संपूर्ण गणित अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी खरे तर बहुतांशी लोक दीर्घकाळात मोठा फंड तयार करण्यासाठी एसआयपी करतात.

काही लोक मासिक 5000 ची एसआयपी करतात तर काही अवघ्या 500 रुपयांच्या एसआयपीतूनही चांगला फंड तयार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला पाचशे रुपयांची एसआयपी केल्यानंतर म्हणजेच प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर 5, 10, 15 आणि 20 वर्षानंतर गुंतवणूकदारांना किती परतावा मिळू शकतो याची माहिती देणार आहोत.

500 रुपयांची एसआयपी 20 वर्षे केली तर

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांची एसआयपी केली तर त्याला अवरेज 12% दराने वीस वर्षांनी चार लाख 99 हजार 574 रुपये मिळतील. यामध्ये एक लाख वीस हजार रुपयांची त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित तीन लाख 79 हजार 574 रुपये हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न राहणार आहेत.

500 रुपयांची एसआयपी 15 वर्षांसाठी केली तर

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांची एसआयपी केली तर त्याला अवरेज 12% दराने 15 वर्षांनी 2 लाख 52 हजार 288 रुपये मिळतील. यामध्ये 90 हजार रुपयांची त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित 1 लाख 62 हजार 288 रुपये हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न राहणार आहेत.

500 रुपयांची एसआयपी 10 वर्षांसाठी केली तर

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांची एसआयपी केली तर त्याला अवरेज 12% दराने 10 वर्षांनी 1 लाख 16 हजार 170 रुपये मिळतील. यामध्ये 60 हजार रुपयांची त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित 56 हजार 170 रुपये हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न राहणार आहेत.

500 रुपयांची एसआयपी 5 वर्षांसाठी केली तर

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड मध्ये पाचशे रुपयांची एसआयपी केली तर त्याला अवरेज 12% दराने 5 वर्षांनी 41 हजार 243 रुपये मिळतील. यामध्ये 30 हजार रुपयांची त्या गुंतवणूकदाराची स्वतःची गुंतवणूक असेल आणि उर्वरित 11 हजार 243 रुपये हे त्या व्यक्तीला मिळालेले रिटर्न राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe