एसआयपी थांबवली तर किती मोठा फटका बसू शकतो? 30 वर्षांच्या गुंतवणुकीत लाखो नव्हे, कोटींचे नुकसान

Published on -

SIP News : आजकाल आर्थिक नियोजन करताना एसआयपी (Systematic Investment Plan) हा सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा आवडता पर्याय ठरत आहे. कमी रकमेपासून सुरुवात करून दीर्घकाळ नियमित गुंतवणूक केल्यास एसआयपीमधून मोठा निधी उभारता येतो.

अनेक जण दरमहा जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. मात्र, काही वेळा घरातील आर्थिक अडचणी, आरोग्यविषयक समस्या किंवा अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे एसआयपी काही महिने थांबवली जाते.

बहुतेक लोकांचा असा समज असतो की एक-दोन महिने किंवा दरवर्षी काही महिने एसआयपी थांबवली तर फारसा फरक पडत नाही. परंतु हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

कारण एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा (Compounding) मोठा फायदा मिळतो. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना सातत्य तुटले, तर भविष्यात मिळणाऱ्या रकमेवर मोठा परिणाम होतो.

हे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. समजा, एखादा गुंतवणूकदार 30 वर्षांसाठी दरमहा 20,000 रुपये एसआयपीमध्ये गुंतवत आहे.

या गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा मिळतो, असे गृहीत धरल्यास 30 वर्षांनंतर त्याला सुमारे 6 कोटी 16 लाख 19 हजार 464 रुपये मिळू शकतात. ही रक्कम केवळ नियमित आणि सलग गुंतवणुकीमुळे शक्य होते.

परंतु जर हाच गुंतवणूकदार प्रत्येक वर्षी तीन महिने एसआयपीच केली नाही, तर चित्र पूर्णपणे बदलते. दरवर्षी तीन महिने गुंतवणूक थांबवल्यामुळे 30 वर्षांत एकूण अनेक हप्ते चुकतात आणि त्यावर मिळणारे चक्रवाढ व्याजही गमावले जाते.

याचा परिणाम असा होतो की अंतिम टप्प्यावर मिळणारी रक्कम थेट सुमारे 5 कोटी रुपयांपर्यंत घसरते. म्हणजेच जवळपास 1.52 कोटी रुपयांचा थेट फटका बसतो.

म्हणूनच तज्ज्ञांचा सल्ला आहे की एसआयपी सुरू करण्याआधी आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार करावा. अचानक अडचण आली तरी एसआयपी थांबवावी लागू नये, यासाठी किमान 6 ते 12 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवणे गरजेचे आहे. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतील, तर एसआयपीमध्ये सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News