5 हजार रुपयांच्या एसआयपीने सुद्धा करोडपती होता येणार! फक्त SIP करतांना ‘हा’ फॉर्म्युला लक्षात ठेवा

Published on -

SIP News : अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. पोस्ट ऑफिसच्या बजेट योजना आणि बँकांच्या एफडी योजनांमधून ग्राहकांना अपेक्षित परतावा मिळत नसल्याने आता अनेकजण शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.

दरम्यान आज आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरंतर ज्या लोकांना शेअर मार्केटची फारशी माहिती नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक बेस्ट पर्याय ठरतो.

म्युच्युअल फंड शेअर बाजारावर आधारित असला तरी देखीलयामध्ये शेअर मार्केट सारखी रिस्क नसते. यामुळे म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक बेस्ट पर्याय बनत चालला आहे.

यात गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ज्यांच्याकडे एक रकमी पैसा नाही ते दर महिन्याला एसआयपी करून मोठा फंड तयार करू शकता.

दरमहा ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकाळात यातून मोठा फंड तयार होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, केवळ 5 हजार रुपयांच्या एसआयपीने सुरुवात करूनही योग्य नियोजनाद्वारे करोडो रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो.

सुरुवातीला 5 हजार रुपयांची एसआयपी छोटी वाटली तरी स्टेप-अप एसआयपीच्या नियमाचा वापर करून दरवर्षी गुंतवणूक 10 टक्क्यांनी वाढवली, तर अपेक्षित 12 टक्के वार्षिक सीएजीआरनुसार 31 वर्षांत 5 कोटी रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.

या कालावधीत एकूण गुंतवणूक सुमारे 1.08 कोटी रुपये असेल, तर परतावा मिळून फंडाची रक्कम 5.05 कोटींवर पोहोचते. याउलट, स्टेप-अप न करता जर दरमहा 5 हजार रुपये स्थिर स्वरूपात गुंतवले, तर तेवढाच फंड तयार करण्यासाठी तब्बल 42 वर्ष लागतात.

अशावेळी एकूण गुंतवणूक केवळ 30.24 लाख रुपये असली तरी परतावा मिळून 5.02 कोटींचा फंड उभा राहतो. मात्र त्यासाठी दीर्घकालीन शिस्तबद्ध गुंतवणूक आवश्यक असते.

स्टेप-अप एसआयपीचा मोठा फायदा म्हणजे पगारवाढीच्या प्रमाणात गुंतवणूक वाढवत गेल्याने अपेक्षित उद्दिष्ट लवकर साध्य करता येते. कमी कालावधीत मोठा फंड उभा राहतो. याशिवाय, काही म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणुकीवर करसवलतीचाही लाभ मिळू शकतो.

तज्ज्ञांच्या मते करिअरच्या सुरुवातीपासून एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू केल्यास निवृत्तीपर्यंत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे सहज शक्य आहे. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टी या दोन गोष्टी लक्षात ठेवल्यास छोट्या रकमेपासूनही कोटींचा फंड तयार होऊ शकतो. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News