Small Business Idea : अलीकडे तरुण वर्गाचा माईंड सेट चेंज झाला आहे. आता नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दाखवले जात आहे. जर तुम्हीही नजीकच्या काळात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. कारण की आज आपण अशा एका बिजनेसची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या सुरुवातीलाच दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येणार आहे.
खरेतर अनेक जण दररोज सकाळी नऊ ते पाच अशा नोकरीला कंटाळले आहेत. यामुळे नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. अनेकजण, शिक्षणानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
दरम्यान जर तुम्हीही स्वतःचा व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्यासाठी ऑप्टिकल बिजनेसचा व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे. हा व्यवसाय एकदा गुंतवणूक करून सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे हा बिजनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला फारशी गुंतवणूक देखील करावी लागणार नाही.
कसा सुरु करणार हा व्यवसाय?
आजकाल चष्मा घालणे हा ट्रेंड झाला आहे. आजकाल लोक स्टाईल म्हणून चष्मा घालतात. त्यामुळे चष्म्याची मागणी पूर्वीपेक्षा अनेक पटीने वाढली आहे. याशिवाय मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या डिव्हाइसच्या वापरामुळे आणि टीव्ही पाहण्यामुळे लोकांची दृष्टीही खराब होऊ लागली आहे.
ज्या लोकांची नजर कमकुवत होते असे लोक चष्मा बसवतात. सहाजिकच चष्मा बसवण्यासाठी ऑप्टिकल शॉपमध्ये जावे लागते. त्यामुळे जर तुम्हीही स्वतःचे ऑप्टिकल शॉप सुरू केले तर तुम्हाला चांगली कमाई करता येणार आहे. विशेष म्हणजे हा बिजनेस बारावी पास तरुण-तरुणी सहज करू शकतात.
मात्र यासाठी तुम्हाला ऑप्टोमेट्री कोर्स करावा लागणार आहे. हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या ऑप्टिकल शॉप मध्ये जाऊन हे काम शिकू शकता. ऑप्टिकल शॉप मध्ये तुम्ही काम केले तर तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल आणि अनुभव प्राप्त केल्यानंतर तुम्ही हा बिजनेस सहजतेने रन करू शकता.
किती गुंतवणूक करावी लागणार
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला एक मोठी अमाऊंट गुंतवावी लागू शकते. या व्यवसायासाठी तुम्हाला एक दुकान भाडेतत्त्वावर घ्यावे लागणार आहे. तुम्ही ज्या शहरात वास्तव्याला असाल तेथेच तुम्ही एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दुकान भाड्यावर घेऊ शकता. दुकान भाड्यावर घेतल्यानंतर तुम्हाला त्या दुकानात फर्निचर करावे लागणार आहे.
तसेच यासाठी काही मशीन्स लागतात त्या मशीन देखील तुम्हाला विकत घ्याव्या लागणार आहेत. या व्यवसायासाठी तुम्हाला सहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. मात्र एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला यातून चांगली कमाई होणार आहे. या व्यवसायातून सुरुवातीपासूनच महिन्याकाठी दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई करता येणे शक्य आहे.
फ्रेंम कुठून घ्याल
राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील चांदणी चौकातून तुम्ही स्वस्त घाऊक दरात फ्रेम विकत घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. असे म्हटले जाते की ऑप्टिकल व्यवसायात 60 टक्के नफा हा फ्रेम्सपासून होतो.
आणि 40 टक्के उत्पन्न लेन्समधून येते. यामुळे या व्यवसायात गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे. तुम्ही तुमच्या शॉप मध्ये सर्व प्रकारच्या फ्रेम्स ठेवण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून तुमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त पर्याय मिळू शकतील. यामुळे तुमच्या कमाई मध्ये वाढ होणार आहे.