750 स्क्वेअरफूट जागेवर सुरू करा ‘हा’ बिजनेस ! 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट मधून सहा लाखाची कमाई पक्की

प्रत्येकच व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल लागते असे नाही. आपल्याकडे काही असेही व्यवसाय आहेत जे अवघ्या काही हजारांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात. तसेच ज्या व्यवसायांमध्ये लाखो रुपयांचे भांडवल लागते त्या व्यवसायांसाठी सरकारकडून कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे.

Tejas B Shelar
Published:

Small Business Idea : भारतात आजही असंख्य लोक इच्छा असतानाही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नाही. याचे कारण म्हणजे बजेट. अनेकांना असे वाटते की व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा-वीस लाखांचे भांडवल लागते आणि त्यानंतरच एखादा व्यवसाय सुरु होऊ शकतो. पण मंडळी प्रत्येकच व्यवसायात मोठ्या प्रमाणात भांडवल लागते असे नाही. आपल्याकडे काही असेही व्यवसाय आहेत जे अवघ्या काही हजारांच्या गुंतवणुकीत सुरू होऊ शकतात.

तसेच ज्या व्यवसायांमध्ये लाखो रुपयांचे भांडवल लागते त्या व्यवसायांसाठी सरकारकडून कर्ज देखील उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान आज आपण अशाच एका व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. जर तुमच्याकडे एक लाख रुपयाचे भांडवल असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करून लाखो रुपयांची कमाई करू शकता. सरकारने अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत ज्यातून व्यावसायिकांना कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाते.

कोणता आहे तो व्यवसाय?

आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो व्यवसाय आहे साबण बनवण्याचा. प्रत्येक घरात साबणाची मागणी असते. हात धुण्यासाठी, आंघोळीसाठी अन कपडे धुण्यासाठी साबणाचा वापर केला जातो. बाजारात विविध प्रकारचे साबण तुम्हाला पाहायला मिळतील.

महत्त्वाचे म्हणजे हा असा प्रॉडक्ट आहे जो प्रत्येक दिवशी लागतो. म्हणजेच बाजारात बाराही महिने या प्रोडक्टची मागणी असते. म्हणून जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही साबण बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

व्यवसायासाठी किती जागा लागणार

साबण कारखाना तयार करण्यासाठी आपल्याकडे कमीतकमी 750 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. यातील 500 चौरस फूट जागेवर बांधकाम करून कव्हर केले जाईल आणि उर्वरित मोकळी राहील. या व्यवसायासाठी आवश्यक असणारी मशीन्स स्थापित करण्यासाठी आणि सेट करण्यासाठी एक लाख रुपये लागतील. तसेच व्यवसाय सुरू होण्यास सात महिने लागतील, त्यानंतर उत्पादन सुरू होईल.

किती गुंतवणूक करावी लागणार

हा संपूर्ण व्यवसाय तुम्ही 15.30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत उभा करू शकता आणि यातून दरवर्षी सहा लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. अर्थातच या व्यवसायातून तुम्हाला दरमहा 50 हजार पर्यंतचा नफा मिळू शकतो.

या व्यवसायासाठी तुम्हाला जवळपास साडे पंधरा लाख रुपये खर्च करायचे आहेत. यात जागा, मशीन आणि तीन महिन्यांच्या खर्चाचा अर्थातच वर्किंग कॅपिटलचा समावेश आहे. जर तुमच्याकडे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एवढे भांडवल नसेल तर तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता.

बँकेकडून किती कर्ज मंजूर होऊ शकतो?

या व्यवसायासाठी आपण बँकांकडून अतिरिक्त कर्ज घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला एकूण खर्चाच्या तुलनेत केवळ 3.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. आपण साबण उत्पादन उद्योग सुरू केल्यास आपल्याला स्वतःहून काहीही करण्याची आवश्यकता नाही.

सरकार आपल्याला या व्यवसाय कल्पनेबद्दल संपूर्ण माहिती देते. याशिवाय व्यवसायासाठी 80 टक्के कर्ज देखील उपलब्ध आहे. येथे सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला कर्जाचा अहवाल देण्याची आवश्यकता नाही. कारण सरकारने हे आधीच केले आहे.

इतकी कमाई होणार

आपण साबण कारखान्यातून एका वर्षात सुमारे 4 लाख किलो साबण तयार करू शकता, ज्याची किंमत 47 लाख रुपये इतकी असेल. जर आपण त्यातून खर्च वजा केला तर दरवर्षी आपल्याला सुमारे सहा लाख रुपये नफा मिळेल. म्हणजेच, आपल्याला दरमहा 50 हजार रुपये मिळतील. http://www.mudra.org.in/ आपण एखादा व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास प्रकल्प अहवाल आणि व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe