Small Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. विशेषता कोरोना काळापासून व्यवसायाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नोकरीमध्ये शाश्वती राहिली नसल्याने आता अनेक जण स्वतःचा छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा अशा विचारात आहेत. जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे.
कारण की आज आपण एका भन्नाट बिजनेस प्लॅनची माहिती पाहणार आहोत. सहसा, जेव्हा कोणी नवीन व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचा व्यवसाय प्रत्येक हंगामात चालला पाहिजे अशी त्याची इच्छा असते. यासह, व्यवसायातून बारा महिने चांगली कमाई व्हावी अशी ही इच्छा नवउद्योजकांची असते.
हिच गोष्ट लक्षात घेऊन आज आपण असा एक बिजनेस प्लॅन घेऊन आलो आहोत ज्यातून पहिल्या दिवसापासून चांगली कमाई होऊ शकते. आम्ही ज्या व्यवसायाबाबत बोलत आहोत तो आहे टोमॅटो सॉस आणि टोमॅटो केचपचा व्यवसाय. खरेतर, टोमॅटोचा समावेश प्रत्येकाच्या आहारात असतो. आजकाल चटणी सुद्धा त्याशिवाय अपूर्ण समजली जाते.
भाज्यांपासून ते सॉस, केचप किंवा पिझ्झा, बर्गर इत्यादी सर्व गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो.वर्षातील 12 महिने बाजारात टोमॅटोला मागणी असते. टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचपला नेहमीच मागणी असते. बहुतेक घरांमध्ये किंवा हॉटेल-रेस्टॉरंटमध्येही याला बारा महिने मागणी असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला यातून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे.
बारा महिने फ्रेश टोमॅटो उपलब्ध नसतात यामुळे अनेक लोक टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप वापरतात. तसेच विविध पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर होतो. म्हणून या प्रॉडक्टची डिमांड ही बारा महिने कायम असते आणि हाच एक मुद्दा हा व्यवसाय यशस्वी बनवण्यास कारणीभूत ठरतो.
टोमॅटो सॉस व्यवसायासाठी किती खर्च येईल
एका सरकारी अहवालानुसार, टोमॅटो सॉस व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 7.82 लाख रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये तुम्हाला स्वतःहून 1.95 लाख रुपये गुंतवावे लागतील. मुद्रा कर्ज योजनेंतर्गत कर्ज घेऊन उर्वरित पैशांची व्यवस्था तुम्ही सहजच करू शकता.
या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि उपकरणे यासाठी दोन लाख रुपये खर्च करावे लागतील. टोमॅटो, कच्चा माल, साहित्य, कामगारांचे पगार, पॅकिंग, टेलिफोन, भाडे आदींवर ५.८२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुदत कर्ज म्हणून 1.50 लाख अन खेळते भांडवल कर्ज म्हणून 4.36 लाख रुपये सहज उपलब्ध होऊ शकतात.
मुद्रा योजनेंतर्गत हे कर्ज कोणत्याही बँकेतून उपलब्ध होईल. जवळपास आठ लाख रुपये गुंतवणूक करून जर एखाद्याने हा व्यवसाय सुरू केला तर त्याचा या व्यवसायाचा टर्नओव्हर हा 28 ते 29 लाख पर्यंत पोहोचू शकतो. जवळपास 24 लाख रुपये यासाठी खर्च करावे लागू शकतात.
म्हणजेच खर्च काढता साडेचार ते पाच लाख रुपये निव्वळ नफा या व्यवसायातून राहू शकतो असा एक अंदाज आहे. हा तुमचा वार्षिक फायदा राहणार आहे म्हणजेच तुम्हाला महिन्याला या व्यवसायातून चाळीस हजार रुपयांपर्यंतची कमाई होण्याची शक्यता आहे.