Small Business Idea : तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का मग तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची राहणार आहे. खरे तर कोरोना काळापासून अनेकजण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. मात्र कोणता व्यवसाय सुरू करावा हे अनेकांना सुचत नाही. दरम्यान जर तुम्हीही अशाच विचारात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे. कारण की आज आपण एका भन्नाट बिजनेस प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत. आम्ही ज्या बिजनेस बाबत बोलत आहोत त्या बिजनेस मधून तुम्ही नोकरीपेक्षा जास्त कमाई करू शकता.
कोणता आहे तो बिजनेस ?
खरेतर, सध्या भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार्सची मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळत आहे. इलेक्ट्रिक कार्स इलेक्ट्रिक स्कूटर समवेत सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांना सध्या बाजारात मोठी मागणी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहे त्यामुळे इलेक्ट्रिक कार इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात डिमांड मध्ये आल्या आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणून फडणवीस सरकारने राज्यातील नागरिकांसाठी देशातील काही महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आणखी वाढणार यात शंकाच नाही. दरम्यान तुम्हीही या संधीचे सोने करू शकता. इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढलेली असल्याने तुम्ही इलेक्ट्रिक वेहिकल चार्जिंग स्टेशनचा बिजनेस सुरू करून चांगली कमाई करू शकता.
टाटा, महिंद्रा सारख्या अनेक दिग्गज कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर फोकस करत आहेत यामुळे आगामी काळ इलेक्ट्रिक वाहनांचाच राहणार आहे ही गोष्ट विचारात घेऊन जर तुम्ही हा बिजनेस सुरू केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होणार आहे. आता आपण या व्यवसायाची सर्व आवश्यक माहिती जाणून घेणार आहोत.
किती जागा लागणार?
जर तुमच्याकडे चार ते पाच वाहनांना पार्क करण्यासाठी जागा असेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता. मात्र यासाठी तुमची जागा हायवेच्या कडेला असायला हवी. हायवे टच असणाऱ्या जागेवर हा व्यवसाय केल्यास तुम्हाला यातून चांगला फायदा होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे अशी जागा नसेल तर तुम्ही भाडेतत्त्वावर जागा घेऊन सुद्धा हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमच्याकडे अशा लोकेशनवर जागा असेल तर तुम्ही एक चार्जिंग पॉईंट लावून सुद्धा या व्यवसायाचा श्री गणेशा करू शकता. पण जर तुम्ही तीन ते चार चार्जिंग पॉइंट लावले तर तुम्हाला यातून चांगली कमाई होणार आहे.
किती गुंतवणूक करावी लागणार?
जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी, तुम्ही वेगवेगळ्या ईव्ही चार्जिंग कंपन्यांकडून चार्जिंग पॉइंट घेऊ शकता. यामध्ये टाटा पॉवर, चार्ज+झोन, प्लगएनगो, चार्जमायगड्डी इत्यादी मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो, अशा परिस्थितीत तुम्ही या कंपन्यांकडून चार्जिंग पॉइंट उभारू शकता आणि तुमच्या व्यवसायाला सुरुवात करू शकता.
महत्त्वाचे म्हणजे यातील काही कंपन्या भागीदारी तत्त्वावर तुम्हाला बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची ऑफर देखील देत आहेत. आता गुंतवणुकीबाबत बोलायचं झालं तर तुम्हाला यासाठी एक लाख रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागणार आहे.
इ रिक्षा चार्जिंग साठी आणि दुचाकी चार्जिंग साठी तुम्हाला चार्जिंग स्टेशन तयार करायचे असेल तर यासाठी तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी विविध राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा दिले जात आहे. म्हणजे तुम्ही अनुदानाचा लाभ घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता आणि यातून तुम्हाला नक्कीच मोठी कमाई होणार आहे.
भारत एसी चार्जिंग पॉईंट्ची किंमत 65 हजार रुपये, भारत डीसीची किंमत 2 लाख 47 हजार रुपये, टाइप 2 एसीची किंमत 1 लाख 20 हजार रुपये आणि सीसीएसची किंमत 14 लाख रुपये इतकी आहे. यापैकी काही चार्जिंग पॉईंट इलेक्ट्रिक बस सुद्धा जलद गतीने चार्ज करण्याची क्षमता ठेवतात. चार्जिंग स्टेशन तयार केल्यानंतर तुम्हाला विज बिल सुद्धा द्यावे लागणार आहे. तुम्हाला कमर्शियल रेटचे वीज बिल भरावे लागणार आहे.
कमाई कशी होणार?
खरेतर, चार्जिंग स्टेशन बिझनेस सुरू केल्यानंतर तुम्हाला प्रति युनिटनुसार कमाई होते. याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीच्या चार्जिंग स्टेशनवर तुम्ही चार्जर बसवता ती कंपनी त्याचे प्रति युनिट पेमेंट किती असायला हवे हे सुद्धा ठरवते.
यामध्ये, तुमच्या जागेचे भाडे, कमिशन आणि विजेचा खर्च मोजला जातो आणि त्यानंतरच प्रति युनिट शुल्क ठरवले जाते. या सर्व गोष्टींचा विचार केला असता हा व्यवसाय सुरू करून दर दिवशी दोन हजार रुपयांचा निव्वळ नफा कमावता येऊ शकतो.