Small Business Idea : तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी आजचा लेख कामाचा ठरणार आहे. आज आपण कमी खर्चात सुरू करता येणाऱ्या एका भन्नाट व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. खरेतर, अलीकडे लोक आपल्या हेल्थ विषयी सजग झाले आहेत अन यामुळे हेल्थी ड्रिंक्सची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
सूपला देखील बाजारात मोठी मागणी आहे. विशेषता हिवाळ्यात याला अधिक मागणी असते. हिवाळ्या सोबतच इतरही ऋतूमध्ये सूप मागणीत असते. उबदार आणि चविष्ट सूप पिण्याची मजा काही औरच असते. त्यामुळेच सूप व्यवसाय हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा मिळवून देणारा उत्तम व्यवसाय ठरू शकतो. दरम्यान आज आपण या व्यवसायाची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
![Small Business Idea](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Small-Business-Idea.jpg)
कमी भांडवल अन जास्त कमाई!
सूप व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते. अवघ्या काही हजार रुपयांमध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. सूप बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या, मसाले आणि काही भांडी एवढाच काय तो मुख्य खर्च करावा लागतो. जर तुम्ही स्टॉल किंवा लहान गाडीवर हा व्यवसाय सुरू केला, तर भाडे आणि इतर खर्चही खूप कमी राहतो.
हिवाळ्यात जबरदस्त मागणी असते
हिवाळ्याच्या ऋतूत या व्यवसायाला अधिक मागणी असते. थंड हवामानामुळे लोक गरम आणि पौष्टिक सूप पसंत करतात. यामुळे शाळा, कॉलेज, ऑफिसजवळ किंवा बाजारपेठेत सूप विक्रीसाठी उत्तम संधी असते. संध्याकाळच्या वेळेस तर सूप विक्रीचा मोठा जोर दिसून येतो.
फक्त चार-पाच तास काम करून मोठा नफा कमवता येतो
सूप व्यवसायात केवळ 4-5 तास काम करूनही हजारोंची कमाई शक्य आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही एका कप सूपची किंमत 30-50 रुपये ठेवली आणि दिवसाला 100 कप विक्री केली, तर सहज 3000 ते 5000 रुपयांची कमाई होऊ शकते. आता आपण सूपचे विविध प्रकार जाणून घेऊयात.
सुपचे प्रमुख प्रकार
टोमॅटो सूप
स्वीट कॉर्न सूप
हॉट अँड सॉर सूप
पालक सूप
चिकन सूप
व्हेज मनचाऊ सूप
व्यवसाय ऑनलाइन सुद्धा सुरु करू शकता
जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे सूप तयार करत असाल, तर झोमॅटो, स्विगी यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. घरी बसूनही सूप व्यवसाय करून चांगली कमाई करणे शक्य आहे.
महिन्याला किती कमाई होणार
हा व्यवसाय दर चांगला चालला तर एका महिन्याला जवळपास 90 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. यामध्ये खर्च वजा केला असता 60000 पासून ते एक लाख रुपयांपर्यंतची कमाई होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यातून महिना एक लाख रुपये इतकी कमाई होणे शक्य आहे. पण यासाठी तुम्हाला कॉलिटी सुप द्यावे लागणार आहे.