फोन हरवल्यानंतर पहिल्या 15 मिनिटात ‘ही’ 5 कामे अवश्य करा !

Published on -

Smartphone News : आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन म्हणजे केवळ कॉल-मेसेजचं साधन राहिलेलं नाही. बँकिंग, UPI, ओळखपत्रे, ईमेल, सोशल मीडिया, फोटो-व्हिडीओ आणि वैयक्तिक माहिती सगळं काही फोनमध्येच असतं.

त्यामुळे फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर आर्थिक नुकसानासोबतच ओळख चोरी (Identity Theft) आणि सायबर फसवणुकीचा मोठा धोका निर्माण होतो. तज्ञांच्या मते, पहिल्या 15 मिनिटांत योग्य पावलं उचलली तर मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. जाणून घ्या फोन हरवल्यानंतर नेमकं काय करायला हवं.

1) सर्वात आधी SIM तात्काळ ब्लॉक करा

फोन हरवल्याचं लक्षात येताच विलंब न करता तुमच्या मोबाइल नेटवर्क कंपनीशी संपर्क साधा. जिओ, एअरटेल, Vi किंवा BSNL — कोणताही नंबर असो, कस्टमर केअरला स्पष्ट सांगा की “माझा फोन हरवला आहे, SIM लगेच बंद करा.” कारण SIM बंद होताच OTP येणं थांबतं, कॉल आणि SMS बंद होतात. UPI आणि बँकिंग फसवणुकीचा सर्वात मोठा मार्ग बंद होतो. यामुळे हेच सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं पाऊल आहे.

2) बँक, UPI आणि डिजिटल वॉलेट तात्काळ ब्लॉक करा

SIM ब्लॉक केल्यानंतरही धोका पूर्णपणे टळत नाही. त्यामुळे लगेच बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करा. Mobile Banking आणि UPI सेवा तात्पुरती बंद करा. Paytm, PhonePe, Google Pay, Amazon Pay अशा सर्व वॉलेट्सना कळवा. अनेक वेळा फोन लॉक असला तरी सेव्ह केलेल्या सेशन्स किंवा कॅशेमुळे ॲप्सचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून तात्पुरतं ब्लॉक करणं अत्यावश्यक आहे.

3) फोन दूरूनच लॉक किंवा डेटा डिलीट करा

स्मार्टफोन कंपन्यांनी दिलेल्या सिक्युरिटी फीचर्सचा वापर करा. Android असल्यास Find My Device व

iPhone असल्यास Find My iPhone या एप्लीकेशन च्या मदतीने तुम्ही तुमचा फोन दुरूनच लॉक किंवा त्यातील डेटा डिलीट करू शकता. याच्या मदतीने तुम्ही फोन रिमोटली लॉक करू शकता.

स्क्रीनवर “हा फोन हरवला आहे” असा मेसेज टाकू शकता. फोनचं लोकेशन पाहू शकता. गरज असल्यास संपूर्ण डेटा डिलीट करू शकता. फोन परत मिळण्याची शक्यता कमी वाटत असेल, तर डेटा डिलीट करणं हाच सुरक्षित पर्याय आहे.

4) पहिल्या 15 मिनिटांत पासवर्ड बदला

दुसरा फोन किंवा लॅपटॉप वापरून तात्काळ पासवर्ड बदला. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या ईमेल चा पासवर्ड बदलून टाका. बँकिंग आणि UPI ॲप्सचा पासवर्ड पण बदला. सोशल मीडिया शॉपिंग आणि क्लाउड स्टोरेज अशा सर्वच ठिकाणी असणारे पासवर्ड तुम्हाला बदलावे लागतील. लक्षात ठेवा ईमेल म्हणजे तुमच्या सगळ्या खात्यांची चावी. ईमेल सुरक्षित असेल, तर बहुतांश अकाउंट्स आपोआप सुरक्षित होतात. शक्य असल्यास Two-Factor Authentication (2FA) सुरू करा.

5) FIR दाखल करा आणि IMEI नंबर ब्लॉक करा

फोन हरवल्यावर अनेकजण FIR टाळतात, पण ते मोठी चूक आहे. तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात FIR दाखल करा किंवा राज्य सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवा. FIR मुळे IMEI नंबर ब्लॉक करता येतो. फोन ट्रॅक होण्याची शक्यता वाढते. इन्शुरन्स क्लेमसाठी कागदोपत्री पुरावा मिळतो. भविष्यातील कोणत्याही फसवणुकीपासून संरक्षण मिळतं. फोन मिळो वा न मिळो, FIR फारच महत्त्वाची आहे.

फोन मिळाल्यावर किंवा नवीन फोन घेतल्यावर काय कराल?

त्याच नंबरचं डुप्लिकेट SIM घ्या. सर्व ॲप्स पुन्हा इन्स्टॉल करा, पण काळजीपूर्वक. बँक स्टेटमेंट आणि UPI ट्रान्झॅक्शन रोज तपासा. फोनसोबत कार्ड हरवलं असेल तर डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक करा. किमान 30 दिवस सतर्क रहा. पुढील काळासाठी फोनमध्ये स्क्रीन लॉक + बायोमेट्रिक, ऑटो-लॉक, क्लाउड बॅकअप, सिक्युरिटी ॲप्स अशा सेफ्टी फीचर्स चा अवश्य वापर करा. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe