पुण्यातील ‘या’ भागात आढळला मांजरीसारखे डोळे आणि चपळता असणारा दुर्मिळ साप ! काय आहेत वैशिष्ट्ये ?

Snake News : जून ते सप्टेंबर हे चार महिने महाराष्ट्रात आणि भारतात पावसाचे असतात. या चार महिन्यांच्या पावसाळी काळात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. देशात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो.

एका अनधिकृत आकडेवारीनुसार देशातच जवळपास 90,000 पेक्षा अधिक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. खरं तर आपल्या देशात फारच बोटावर मोजण्या इतक्या सापांच्या प्रजाती विषारी आहेत.

देशात सापांच्या शेकडो प्रजाती पाहायला मिळतात मात्र यापैकी काही बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती विषारी आहेत.

देशातील बहुतांशी सापांच्या जाती बिनविषारी आहेत तर काही जाती या सौम्य विषारी आहेत. दरम्यान आता पुण्यात एक दुर्मिळ साप आढळून आलाय. हा साप अंत्यत दुर्मिळ असून त्याचे डोळे हुबेहूब मांजरीसारखे दिसतात.

कुठे आढळला दुर्मिळ साप?

मिळालेल्या माहितीनुसार भोर येथील बनेश्वर परिसरात हा दुर्मिळ साप आढळून आला आहे. सापाची विशेषता म्हणजे या सापाचे डोळे हुबेहूब मांजरीसारखे दिसतात आणि याची चपळता सुद्धा मांजरी सारखीच आहे.

म्हणूनच याला बेडडोम मांजऱ्या साप म्हणून ओळखले जाते. बनेश्वर परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या दुचाकीच्या पुढच्या कॅपमध्ये हा दुर्मिळ साप आढळून आला आहे.

बनेश्वर परिसरातील शेतकरी करण जाधव यांना हातात दिसला आणि त्यांनी तात्काळ सर्पमित्रांना पाचारण केले. यानंतर सर्पमित्रांनी हा साप पकडला आणि त्याला वनक्षेत्रातील अधिवासात सोडण्यात आले.  

मांजऱ्या सापाची वैशिष्ट्ये काय आहेत? 

बेडडोम मांजऱ्या साप हा एक दुर्मिळ साप असून या सापाचे संवर्धन होणे आवश्यक आहे. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सापाचे वास्तव्य झाडांवर असते. हा साप झाडांवर राहतो. त्यामुळे याची चपळता इतर सापांच्या तुलनेत थोडी अधिक असते.

हा साप सौम्य विषारी असतो आणि रात्रीच्या वेळेस सक्रिय असतो. या सापाचे डोळे हुबेहूब मांजरी सारखे दिसतात आणि चमकतात. याची चपळता सुद्धा फारच अधिक असते. हा साप अगदी मांजरीप्रमाणेच चपळ असतो.