Snake Viral News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. देशातील काही भागांमध्ये मान्सून ने दस्तक दिली असून लवकरच मान्सून संपूर्ण देशात पोहचेल. खरंतर पावसाळा सुरू झाला की देशात सर्पदंशाच्या घटना वाढत असतात.
वास्तविक भारतात सापांच्या असंख्य प्रजाती आढळतात पण यातील काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत. पण तरीही देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे.

त्यामुळे साप दिसला की अंगावर काटा उभा राहतो. तुम्ही आतापर्यंत जगातील सर्वाधिक लांब साप आणि विषारी साप पाहिले असतील पण तुम्ही जगातील सर्वाधिक छोटा साप पहिला आहे का ? नाही ना मग आज आपण याच जगातील सर्वाधिक छोट्या सापाची माहिती जाणून घेणार आहोत.
हा आहे जगातील सर्वात छोटा साप
आम्ही ज्या सापा बाबत बोलत आहोत तो साप फक्त दहा सेंटीमीटर लांब असतो. 10 सेंटीमीटर लांबीचा, 0.6 ग्रॅम वजनाचा आणि पेन्सिल पेक्षा पातळ दिसणारा हा साप जगातील सर्वात छोटा साप म्हणून ओळखला जातो.
याला बारबाडोस थ्रेड स्नेक या नावाने ओळखले जाते. असं म्हणतात की हा साप एका छोट्याश्या नाण्यावर देखील बसू शकतो. जर तुम्ही या सापाला पाहिलेत तर तुम्हाला हा खरोखरचं एक साप आहे यावर विश्वास बसणार नाही.
पण हा वास्तविक एक साप आहे आणि तो जगातील सर्वात छोटा साप म्हणून प्रसिद्ध सुद्धा आहे. जंगलात आढळून येणारा हा साप निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे.
हा साप पेन्सिलपेक्षा पातळ आणि लहान आहे. या सापाचे वैज्ञानिक नाव ग्रीक शब्द “टेट्राकिलोस्टोमा” वरून आले आहे. हा साप अगदी पातळ धाग्यासारखा आहे.
विषारी आहे की बिनविषारी?
जगात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती विषारी आहेत तर काही प्रजाती बिनविषारी. एखाद्या धाग्यासारखा दिसणारा बारबाडोस थ्रेड स्नेक हा जगातील सर्वात छोटा साप आहे.
साहजिकच हा साप विषारी आहे की बिनविषारी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे. हा साप माणसाला चावत नाही.
हा साप मुंग्या आणि वाळवीच्या अळ्या आणि अंडी खातो. या सापाची मादी एका वेळी फक्त एक अंडी देते. हा साप फक्त बारबाडोसध्ये ते पण त्याच्या पूर्वेकडील भागात आढळतो. बारबाडोस मधील जंगलापुरतेच या सापाचे वास्तव्य आहे.