Snake Viral News : साप आपल्याला फक्त दिसला तरी अंग भीतीने कापते, अगदीच पायाखालची जमीन सरकते. खरेतर साप हा एक सरपटणारा आणि विषारी प्राणी. भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आहेत आणि या प्रजातींमध्ये बहुतांशी प्रजाती या बिनविषारी आहेत. पण काही प्रजाती या विषारी आहेत.
बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या जाती विषारी आहेत, मात्र तरी देखील देशात दरवर्षी सर्पदंशामुळे एका लाखाच्या आसपास लोक मृत्युमुखी पडत असल्याची माहिती समोर आली आहे. पण साप मुंगुसाला डसतो तरी त्याला काहीच होत नाही.

विषारी सापाने मुंगुसाला कितीही वेळा चावले तरी त्याला काही होत नाही, असं आपल्याला वाटतं ? पण खरंच तस आहे का ? आणि हो तर मग याच्यामागे नेमके कारण काय ? याच प्रश्नाचे उत्तर आता आपण जाणून घेणार आहोत.
सापाच्या विषाचा मुंगसावर परिणाम का होत नाही?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, साप आणि मुंगूस यांच्यातील संघर्ष हा निसर्गातील एक रोचक विषय मानला जातो. तुम्हीही कधी ना कधी साप आणि मुंगूस यांच्यातील जबरदस्त फाईट पाहिली असेल.
सोशल मीडियावर देखील मुंगूस आणि साप यांच्यातील लढतीचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मुंगूसबाबत बोलायचं झालं तर हा छोटा सस्तन प्राणी आहे अन हा प्राणी आफ्रिका, दक्षिण आशिया आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायाला मिळतो.
मुंगुस बहुधा जमिनीत बिळं खोदून किंवा झाडांच्या पोकळीत राहतो. या प्राण्याचे अन्न विविध प्राण्यांपासून ते फळांपर्यंत असतं. दरम्यान, मुंगुस हा फारच चपळ प्राणी म्हणून ओळखला जातो, त्यातल्या त्यात सापांचा मुकाबला करण्यात मुंगूस अतिशय चपळ असतो.
जाणकार लोक सांगतात की, सापाच्या विषातील अल्फा-न्युरोटॉक्सिन मुळे सामान्यतः कोणत्याही प्राण्याचा मृत्यू ओढवतो. अगदीच महाकाय हत्ती सुद्धा सापाच्या विषाने मरू शकतो.
मात्र मुंगसाच्या शरीरात असलेल्या अॅसेटिलकोलीन रिसेप्टरमधील नैसर्गिक बदलांमुळे तो सापाच्या विषाचा प्रतिकार करण्यास सक्षम असल्याची माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.
त्यामुळे साप चावल्यावरही मुंगूस वाचतो. पण, दरवेळी मुंगूस वाचू शकत नाही. जर साप अधिक जालीम असेल, अत्यंत विषारी असेल अन त्याने मोठ्या प्रमाणात मुंगसाच्या शरीरात विष सोडले तर तो सुद्धा मरू शकतो.
म्हणजे आपल्याला सापाच्या चाव्याने मुंगसाला काहीच होत नाही असं जर वाटत असेल तर हे साफ चुकीचे आहे. कारण साप-मुंगसातील लढतीत प्रत्येक वेळा जिंकणारा मुंगसाला सुद्धा सापाचा धोका असतोच.