Snake Viral News : सापाचे नाव ऐकलं तरी थरकाप उडतो. सर्पदंशामुळे दरवर्षी भारतात हजारो लोकांचा जीव जातो. एका शासकीय आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी 58000 हून अधिक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. मात्र असे असले तरी भारतात आढळणाऱ्या सर्वच सापांच्या जाती विषारी नाहीयेत.
अगदीच बोटावर मोजण्या इतक्या जाती विषारी आहेत. पण असे असतानाही दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात हजारो नागरिक मरतात आणि यामुळे साप दिसला की दोन हात लांबचं राहिले पाहिजे.
सापांना मारण्याचा प्रयत्न करू नये, साप हे पर्यावरणासाठी आवश्यक आहेत. शिवाय सापांना मारण्याच्या प्रयत्नात अनेकांना सर्पदंश झाला आहे. यामुळे सर्प दिसला की सर्वप्रथम सर्पमित्रांना पाचारण करावे आणि तो साप जंगलात सोडून द्यावा.
साप पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळाबाहेर पडतात. बिळामध्ये पाणी शिरते यामुळे पावसाळ्याच्या दिवसात घरात व घराच्या आजूबाजूला साप निघण्याची शक्यता असते.
पावसाळ्याप्रमाणे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील अन्नाच्या शोधात साप मानवी वस्तीत फिरण्याची भीती असते. जी मानवी वस्ती जंगलाला लागून असते किंवा जे लोक जंगलात राहतात अशा ठिकाणी साप निघण्याची भीती अधिक असते.
दरम्यान, आज आपण अशा काही झाडांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या झाडांकडे साप आकर्षित होतात. त्यामुळे जर तुमच्याही अंगणात यापैकी एखादे झाड असेल तर ते तुम्ही उपटून टाकले पाहिजे किंवा त्या झाडाच्या आजूबाजूला विशेष लक्ष ठेवले पाहिजे.
चाफ्याचं झाड – अनेक जण आपल्या अंगणात चाफ्याचे झाड लावतात. याचे फूल फारच सुगंधित असते. यामुळे अनेकांच्या अंगणात तुम्हाला हे झाड पाहायला मिळेल. पण या झाडाच्या फांद्या आणि पान हे सापांना लपण्यासाठी एक सुरक्षित आश्रय देते. यामुळेच चाफ्याचे झाड घराच्या अगदीच जवळ लावू नये असा सल्ला दिला जातो.
गोकर्णीचा वेल – असे सांगितले जाते की ज्या ठिकाणी गोकर्णीचा वेल असतो तिथे साप येतात. गोकर्णीच्या वेलाला निळे फुलं येतात, ही फुले सापांना आकर्षीत करतात असा दावा काही लोकांनी केला आहे. या वेलाला दाट पानं असल्यामुळे साप या वेलाच्या पानात आश्रय घेतात.
त्यामुळे अंगणात किंवा कंपाउंड जवळ अशा प्रकारची वेल वाढू देऊ नये. जर समजा अशी वेल तुमच्या अंगणात असेल किंवा कंपाउंड वर असेल तर तुम्ही या वेल जवळून जाताना विशेष काळजी घेतली पाहिजे.
लँटाना वनस्पती – लँटानाच्या झाडाला येणाऱ्या फुलांची चमक ही सापांना आकर्षित करते. या झाडाला दाट आणि छोटी-छोटी पानं असतात. त्यामुळे या झाडांमध्ये साप सहज लपू शकतो. यामुळे या झाडाजवळ जातानाही विशेष काळजी घेतली पाहिजे किंवा हे झाड घराच्या अंगणात लावणे टाळले पाहिजे.