तुमच्याही अंगणात, घराजवळ आहेत का ‘ही’ झाडे, मग लगेचच उपटून फेका, विषारी सापांना देताय आमंत्रण

तुम्हालाही सापांची भीती वाटते का ? मग आज आम्ही तुम्हाला अशा दोन झाडांची माहिती सांगणार आहोत ज्यापासून तुम्ही विशेष सावध राहायला हवे. खरंतर, काही झाडे सापांना आकर्षित करतात. 

Published on -

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. यामुळे साप डोळ्याला दिसला तरी देखील आपली पायाखालची जमीन सरकत असते. खरे तर भारतात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात आणि त्या सर्वच प्रजाती विषारी नाहीत.

मात्र ज्या चार-पाच प्रजाती विषारी आहेत त्यांच्या चावण्यानेचं सर्पदंशामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. भारतात मन्यार, घोणस, कोब्रा अशा काही बोटावर मोजण्या इतक्या जाती विषारी आहेत.

दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. असं म्हणतात की काही वनस्पती सापांना आकर्षित करतात. दरम्यान आज आपण अशाच दोन वनस्पतींची माहिती जाणून घेणार आहोत ज्या वनस्पतींवर साप आश्रय घेतात.

या झाडांवर साप आश्रय घेतात

लिंबू : लिंबू हे एक फळझाड आहे. ही एक औषधी वनस्पती सुद्धा आहे. लिंबूचा वापर सरबत बनवण्यासाठी तसेच सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो. याव्यतिरिक्त डिटर्जंट पावडर बनवण्यासाठी तसेच इतर ठिकाणी सुद्धा लिंबू चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

लिंबूचे हे आंबट फळ पक्षांना देखील खूपच आवडते. छोटे मोठे कीटक उंदीर आणि पक्षी लिंबूचे फळ मोठ्या आवडीने खातात. यामुळे लिंबूच्या झाडाजवळ कीटकांची आणि उंदरांची मोठी संख्या असते. हेच कारण आहे की साप लिंबूच्या झाडाजवळ असणाऱ्या कीटकांना आणि उंदरांना खाण्यासाठी येण्याची शक्यता असते.

त्यामुळे जर तुमच्या घराजवळ, अंगणात किंवा बागेत लिंबूचे झाड असेल तर तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी. लिंबाच्या झाडाच्या आजूबाजूला नेहमीच साफसफाई असणे आवश्यक आहे. तसेच या झाडाला जवळून जाताना तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे.

चंदनाचे झाड : लिंबाच्या झाडाप्रमाणे चंदनाच्या झाडावरही सापांचा वावर पाहायला मिळतो. चंदन ही एक औषधी वनस्पती आहे. या औषधी वनस्पतीचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर होतो. हिंदू धर्मात चंदनाला विशेष महत्त्व आहे.

हिंदू सनातन धर्मात चंदनाला पवित्र मानले गेले आहे. हिंदू लोक चंदनाचा टीका लावतात. चंदनाचे लाकूड बाजारात फारच चढ्या दराने विकले जाते आणि यामुळे चंदनाची शेती देखील मोठ्या प्रमाणात केली जाते.

मात्र हेच चंदनाचे झाड सापांचे दुसरे घर म्हणून ओळखले जाते. चंदनाचे झाड हे सापांचा अड्डा आहे असेच म्हणतात. तज्ञ लोक सांगतात की चंदनाच्या झाडावर जास्त साप राहतात कारण हे औषधी झाड फारच थंड आणि सुगंधी असते.

सापांना राहण्यासाठी थंड, गडद ठिकाणे आवडतात आणि चंदनाच्या झाडाभोवती याच कारणांमुळे सापांचा वावर आपल्याला दिसतो. जाणकार लोक म्हणतात की साप हे आपल्या शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी चंदनाच्या झाडांभोवती राहतात.

यामुळे जर तुमच्याही घराजवळ किंवा अंगणात शेतात चंदनाचे झाड असेल तर तुम्ही या झाडा जवळून जाताना विशेष काळजी घ्यायला हवी. घराच्या अंगणात चंदनाचे झाड असेल आणि तुम्हाला जर तिथे साप आढळत असतील तर तुम्ही झाड उपटून दुसरीकडे ते झाड लावायला हवे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News