‘ही’ वस्तू सापांना अजिबात आवडत नाही ! तुमच्या घरात ही वस्तू असल्यास साप तुमच्या घराच्या आसपास पण फिरकटणार नाहीत

साप म्हटलं की आपल्या अंगाचा थरकाप उडत असतो. आपल्यापैकी कित्येकांना सापाची भीती वाटत असेल. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल आणि घरात किंवा अंगणात साप निघू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका वस्तूची माहिती देणार आहोत जी वस्तू घरात ठेवली तर तुमची सापांची भीती कायमची दूर होणार आहे.

Published on -

Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आपल्या देशात फारच अधिक आहे. एका आकडेवारीनुसार, दरवर्षी सर्पदंशामुळे भारतात जवळपास 58 हजाराहुन अधिक लोक मरण पावतात. खरंतर आपल्या देशात सापांच्या बाबत वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. सापांच्या बाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज सुद्धा तयार झाले आहेत.

म्हणूनच सापांबाबत नेहमीच मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा होत असते. आपल्याला पावसाळ्यात साप चावण्याच्या घटना अधिक ऐकायला मिळतात. कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरते आणि यामुळे साप बिळाबाहेर पडतात आणि मानवी वस्तीमध्ये आश्रय घेत असतात.

उन्हाळ्यात सुद्धा साप चावण्याच्या घटना घडतात मात्र प्रमाण कमी असते उन्हाळ्यात साप अन्नाचा शोधात मानवी वस्तीमध्ये घुसू शकतो, अन यामुळे उन्हाळ्यात देखील सर्पदंश होत असतो. यामुळे सर्वसामान्य नागरिक सापांना घाबरतात. दरम्यान आज आपण अशा एका वस्तूची माहिती जाणून घेणार आहोत ज्याला साप खूप घाबरतो. ही वस्तू जर घरात असेल तर साप घरात सोडा अंगणात सुद्धा चमकणार नाही.

भारतातील सापांच्या विषारी जाती कोणत्या ?

आपल्या देशात सापांच्या असंख्य प्रजाती आढळतात. मात्र यातील सर्वच जाती विषारी नसतात. आपल्या देशात बोटावर मोजण्या इतक्याच सापाच्या जाती विषारी असल्याचे सांगितले जाते. मात्र असे असले तरी सर्पदंशामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो ही वास्तविकता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आपल्या राज्यात आणि सबंध भारतात मण्यार, फुरसे, घोणस, आणि ज्याला आपण कोब्रा म्हणतो तो नाग या चार जाती सर्वात जास्त विषारी असून याच जातींच्या चावण्यामुळे माणसाचा मृत्यू होत असतो.

या विषारी जातींच्या सापाने जर चावा घेतला तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे साप चावल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात जाणे सर्वात फायद्याचे ठरते. मांत्रिकाच्या नादी न लागता सर्पदंश झाल्यानंतर थेट रुग्णालयात जावे असे आवाहन देखील जाणकार लोक करतात.

या वस्तूंमुळे साप घरात घुसत नाही 

जगात अशा असंख्य औषधी वनस्पती आहेत ज्या की विविध आजारांमध्ये उपयोगी ठरतात आणि आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी देखील अशा वनस्पतींचा वापर होतो. दरम्यान, जंगलात आढळणाऱ्या काही वनस्पतींचा तीव्र वास सापांना अजिबात सहन होत नाही.

भारतीय जंगलात आढळणारी मारुआडोना ही अशीच एक औषधी आणि गुणकारी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वासांपासून साप नेहमीच लांब राहतात. या वनस्पतीला आपल्याकडे जंगली तुळस म्हणून ओळखले जाते. काही ठिकाणी ही वनस्पती इतर नावाने सुद्धा ओळखली जाते. या वनस्पतीला असणाऱ्या तीव्रवासामुळे यापासून साप लांब राहतात.

यामुळे ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी मंडळी आपल्या घरांमध्ये या रान तुळशीच्या फांद्या ठेवतात तसेच अनेक जण गुरांच्या गोठ्यामध्ये देखील या वनस्पतीच्या फांद्या ठेवतात. असं म्हणतात की या वनस्पतीची पाने वाळवून घरात ठेवली पाहिजे. असे केल्यास घरात साप घुसण्याची भीती नाहीशी होते. या वनस्पतीच्या पानांचा वास हा किमान एक वर्षभर कायम राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News