सापांची भीती वाटते ? मग ‘ही’ 10 रुपयांची वस्तू आपल्या घरात ठेवा, साप चुकूनही घरात घुसणार नाही

सापांची भीती वाटते का ? मग आजची बातमी खास तुमच्याच कामाची आहे. खरतर, सापाला प्रत्येकजण घाबरतो. म्हणूनच आज आपण अशा काही वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत ज्यापासून साप नेहमी दूर पळतो.

Published on -

Snake Viral News : जगात सापाच्या असंख्य प्रजाती आढळतात. आपल्या देशात सुद्धा सापाच्या शेकडो प्रजाती आढळून येतात आणि यातील अगदीच बोटावर मोजण्याइतक्या प्रजाती विषारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. देशात आढळणाऱ्या बहुसंख्य प्रजाती या बिनविषारी कॅटेगिरी मधील आहेत. मात्र असे असले तरी आपल्या देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.

तज्ज्ञांच्या मते, जगात सापांच्या 3 हजारांहून अधिक प्रजाती आहेत. दरवर्षी हे साप 55 ते 60 लाख लोकांना चावतात. परंतु सर्पदंशामुळे फक्त 7 टक्के लोकांचा मृत्यू होतो. तथापि, योग्य वेळी उपचार केल्यास मृत्यू टाळता येतो. एका आकडेवारीनुसार, आपल्या देशात दरवर्षी 50 ते 60 हजार लोक सर्पदंशामुळे मरण पावतात.

देशात फक्त चार ते पाच सापांच्या जाती विषारी आहेत. किंग कोब्रा, मन्यार, फुरसे, घोणस यां सापांच्या जाती विषारी आहेत. मात्र असे असतानाही देशात सापांच्या चावण्याने मरण पावणाऱ्यांची संख्या फारस अधिक आहे आणि यामुळे लोकांना सापांची खूप भीती वाटते. साप दिसला तरी पायाखालची जमीन सरकते.

पण आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यामुळे साप तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत. आज आपण अशा काही वस्तूंची माहिती जाणून घेणार आहोत ज्याच्या वासामुळेच साप लांब पळतो. यामुळे जर या अशा वस्तू घरात असल्या तर साप घरात येण्याची शक्यताच राहत नाही.

या वस्तूंपासून साप नेहमी लांब पळतो

असे म्हणतात की सापांना अधिक तीव्र वास सहन होत नाही. त्यांना रान तुळशीचा वास सुद्धा सहन होत नाही. रानतुळशीच्या वासाने तसेच रॉकेल, फिनाईल यांसारख्या पदार्थाच्या वासाने साप लांब पळतो. याशिवाय प्रत्येक स्वयंपाक घरात आढळणाऱ्या काही मसाले पदार्थांचा वास सुद्धा सापाला सहन होत नाही.

लिंबाच्या रसात काळी मिरी पावडर मिसळून खोलीच्या कोपऱ्यात पसरवली तर साप जवळ येत नाही असा दावा काही लोक करतात. काळी मिरी पावडर आणि लिंबाचा रस एकत्रित मिसळल्यानंतर जो तीव्र वास येतो तो वास सापाला सहन होत नाही.

त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या घरात साप बसू शकतो अशी भीती वाटत असेल तर तुम्ही हा उपचार करून बघायला काही हरकत नाही. याव्यतिरिक्त आणखी एक उपाय सांगितला गेला आहे आणि तो उपाय म्हणजे दालचिनी पावडर आणि पांढरा व्हिनेगर मिसळून त्याचा स्प्रे करणे.

तुम्ही दालचिनी पावडर आणि पांढरा व्हिनेगर मिसळून घराबाहेर स्प्रे केल्यास यातून जो वास येतो त्यामुळे साप घरापासून लांब राहतात असे बोलले जात आहे. एवढेच नाही तर लसूण आणि तेल यांचे मिश्रण सुद्धा साप दूर पळवण्यात मदत करू शकते. जर तुम्ही लसूणमध्ये तेल मिसळून ते दररोज आपल्या घराभोवती शिंपडले तर साप घरात प्रवेश करणार नाही असा दावा करण्यात आला आहे.

जर तुम्हाला वर सांगितलेलं कोणतेच उपाय शक्य झाले नाही तर तुम्ही कडुलिंबाचे तेल सापांना हाकलण्यासाठी वापरू शकता. जर तुम्ही पाण्यात कडुलिंबाचे तेल मिसळून ते दररोज घरात आणि अंगणात तसेच घराबाहेर फवारले तर साप दूर राहणार आहेत.

घराजवळ या झाडांची लागवड पण करा

आम्ही सांगितलेले वरील उपाय करूनही तुम्हाला जर साप घरात घुसूच शकतो अशी भीती वाटत असेल तर तुम्ही अशा काही वनस्पतींची आपल्या घराच्या अंगणात किंवा परसबागेत लागवड केली पाहिजे ज्या वनस्पतींपासून साप नेहमी लांब राहणे पसंत करतो.

तज्ञ लोक सांगतात की साप कॅक्टस, सापाचे झाड, तुळशीचे झाड, लेमन ग्रास अशा इत्यादी वनस्पतीपासून लांब राहतो. यामुळे या वनस्पती आपल्या घराच्या अंगणात, बागेत अवश्य लावल्या गेल्या पाहिजेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या वनस्पती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि खिडक्यांजवळ सुद्धा लावू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe