‘ही’ 4 झाडे सापांच्या शत्रुपेक्षा कमी नाहीत….! या झाडांची अंगणात लागवड केल्यास सापांचे टेन्शन मिटणार

तुम्हालाही सापांची भीती वाटते ना ? मग आजचा हा लेख खास तुमच्या कामाचा आहे. आज आपण सापांचे शत्रू अशी ओळख असणाऱ्या चार झाडांची माहिती पाहणार आहोत. या झाडांची घराजवळ लागवड केल्यास साप घरात शिरण्याची भीती नाहीशी होते.

Published on -

Snake Viral News : सध्या सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे साप मोठ्या प्रमाणात बिळातून बाहेर पडण्याची भीती सुद्धा आहे. खरे तर पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साप बिळातून बाहेर पडतात.

पावसाळी काळात बिळामध्ये पाणी शिरते आणि यामुळे सापांना नाईलाज म्हणून बाहेर पडावे लागते. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे साप बाहेर पडतात. यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना अधिक घडतात आणि अनेक लोकांचा यामुळे मृत्यू सुद्धा होतो.

एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 80 ते 90 हजार लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो. अशा परिस्थितीत उन्हाळी दिवसांमध्ये आणि पावसाळ्याच्या काळात सर्वसामान्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला अशा चार झाडांची माहिती सांगणार आहोत ज्या झाडांची तुम्ही तुमच्या अंगणात, घरात किंवा परसबागेत लागवड केल्यास तुमच्या अंगणात तसेच घरात साप चुकून सुद्धा घुसणार नाही.

आज आपण ज्या चार झाडांची माहिती पाहणार आहोत त्याला खऱ्या अर्थाने आपण सापांचे शत्रू म्हणू शकतो. कारण की या झाडांजवळ साप इच्छा असताना सुद्धा जात नाहीत. कारण म्हणजे या झाडांना असणारा तीव्र वास.

या झाडांपासून साप नेहमीच लांब राहतात

सर्पगंधा : सर्पगंधा ही एक औषधी वनस्पती आहे. सर्पदंश झाल्यानंतर या वनस्पतीचा वापर होतो. याशिवाय इतरही वेगवेगळ्या औषधांच्या निर्मितीमध्ये ही वनस्पती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मात्र ही औषधी वनस्पती सापांना अजिबात आवडत नाही.

सर्पगंधा वनस्पतीमधून जो तीव्र वास येतो तो सापांना अजिबात आवडत नाही. म्हणून जर तुम्हाला सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या अंगणात सर्पगंधा ही औषधी वनस्पती लावू शकता यामुळे साप त्या भागापासून दूर राहतात.

पुदिना आणि झेंडू : पुदिना ही एक औषधी वनस्पती आहे तर झेंडू ही एक फुल वनस्पती आहे. आपल्याकडे झेंडूच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पुदिना या वनस्पतींची पाने फारच गुणकारी असतात आणि याचा अनेकजण आहारात सुद्धा समावेश करतात. पुदिनाचा चहा सुद्धा बनवला जातो.

तर झेंडू या फुलाची अनेक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करतात. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुम्ही पुदिना आणि झेंडू या दोन्ही वनस्पतींची लागवड करू शकता यामुळे साप तुमच्या घराजवळ फिरकणार सुद्धा नाही. 

गवती चहा : गवती चहा झाला इंग्रजीत लेमन ग्रास असे म्हणतात ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे. आपल्याकडे अनेक ठिकाणी लेमनग्रस्त व्यावसायिक शेती केली जाऊ लागली आहे. लेमन ग्रासचा वापर हा चहा मध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

पण या वनस्पतीचा वास सापांनाच नव्हे, तर डासांनाही नकोसा वाटतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या अंगणात किंवा परसबागेत गवती चहा लावल्यास दुहेरी फायदा मिळणार आहे.

लसूण : लसूण ही अशी एक वनस्पती आहे ज्याचा वास सापांना सहन होत नाही. लसणामधील सफ्लोनिड अॅसिड हे घटक असतात जे की सापांना दूर ठेवते.

यामुळे तुम्ही तुमच्या अंगणात किंवा परसबागेत लसणाची लागवड करू शकता किंवा मग स्वयंपाकघरात लसूण ठेवू शकता. असे केल्यास तुमच्या घरात साप शिरण्याची भीती कमी होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe