‘ही’ आहेत सापांची आवडती झाडे ! घराशेजारी या झाडांची लागवड केल्यास सापांचा धोका वाढतो

तुम्हालाही सापांचा धोका वाटतो का मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. आज आपण अशा काही झाडांची माहिती पाहणार आहोत ज्याकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात.

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे आणि देशात सर्पदंशाच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप नेहमीच मानवी वस्तीमध्ये घुसतो. निवाऱ्याच्या तसेच अन्नाच्या शोधात साप पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मानवी वस्तीमध्ये घुसण्याची शक्यता असते.

खरे तर भारतात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत मात्र यापैकी काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी असतात. मात्र असे असले तरी देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे साप डोळ्याला दिसला तरी देखील अंगावर काटा उभा राहतो. दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहेत.

खरे तर निसर्गात अशा काही वनस्पती आहेत ज्यांच्याकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. दरम्यान आज आपण अशाच काही झाडांची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला अशा काही वनस्पती असतील तर तुम्ही विशेष काळजी घायला हवी.

 या वनस्पती सापांना विशेष आवडतात

अपराजिता : खरे तर अपराजिता ही एक सुंदर फुलांचे आणि औषधी वनस्पती आहे. अपराजिता चे फुल वेगवेगळ्या कलर मध्ये येते. मात्र ही वनस्पती सुद्धा सापांना निमंत्रण देऊ शकते. ही वनस्पती थेट सापांना आकर्षित करत नाही परंतु ही वनस्पती अगदीच द्राक्षांच्या वेलीसारखी पसरते आणि या वनस्पतीची पाने दात असतात.

त्यामुळे या वेलवर्गीय वनस्पतीच्या खाली जमीन थंड असते. परिणामी अशा ठिकाणी बेडूक आणि कीटकांची संख्या अधिक असते. यामुळे अशा झाडांजवळ साप अन्नाच्या शोधात येऊ शकतात. तसेच जर या वनस्पतीच्या खाली गवत असेल तर मग साप लपण्यासाठी ही जागा बेस्ट ठरते. म्हणून जर तुमच्याही घराच्या आजूबाजूला हे वेल असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी.

चंपा : चंपा ही देखील एक सुंदर आणि सुवासिक फुलांची वनस्पती आहे. अनेक जण आपल्या घराच्या अंगणात, बॅक यार्ड मध्ये आणि बगीचामध्ये या वनस्पतीची लागवड करतात. मात्र या वनस्पतीची पाने देखील फारच दाट असतात आणि या वनस्पतीच्या आजूबाजूला थंडावा असतो.

शिवाय या झाडाच्या आजूबाजूला तुम्हाला नेहमीच कीटक आणि लहान प्राणी दिसतात. यामुळे अन्नाच्या शोधात या झाडांच्या जवळ येऊ शकतात. या वनस्पतीच्या झुडपांमध्ये साप लपून बसण्याची शक्यता असते. यामुळे या झाडाच्या जवळून जाताना विशेष काळजी घ्यायला हवी.

चमेली : ही देखील एक सुवासिक फुलांची सुंदर वनस्पती आहे. असे म्हणतात की या फुलझाडांचा गोड सुगंध सापांना आकर्षित करत असतो. त्यामुळे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला चमेलीचे झाड असेल तर तुम्ही काळजी घ्यायला हवी.

शक्यतो घराच्या आजूबाजूला हे झाड लावूच नये. पण जर लावलेले असेल तर या झाडाचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि या झाडा जवळून जाताना नेहमीच सावधानता बाळगावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!