‘ह्या’ झाडांची घराजवळ लागवड केल्यास सापांचा धोका कमी होतो !

तुम्हालाही तुमच्या घरात साप घुसतील अशी भीती वाटते का ? अहो पण आता चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला अशा काही झाडांची माहिती सांगणार आहोत ज्यांची तुम्ही तुमच्या घराशेजारी लागवड करून सापांचा धोका टाळू शकता. 

Published on -

Snake Viral News : पावसाळा सुरू झाला की रखरखत्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळतो. खरे तर पावसाळा हा असा ऋतू आहे जेव्हा सगळीकडे अल्हाददायक वातावरणाची अनुभूती येते. यामुळे आपल्याला सर्वांनाच पावसाळा ऋतू विशेष प्रेम. या ऋतूमध्ये अनेक जण पर्यटनाचा प्लॅन बनवतात.

मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांचा धोका वाढतो. पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी शिरते आणि म्हणून साप अन्नाच्या शोधात आणि निवाऱ्याच्या शोधात मानवी वस्तीचा आसरा घेतात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्पदंशाच्या घटना वाढतात.

विशेषतः जी घरे जंगलाच्या जवळ आहेत, जे लोक शेतात राहतात अशा लोकांना सापांचा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका वाटत असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे.

कारण आज आपण अशा काही झाडांची माहिती जाणून घेणार आहोत जी झाडे तुम्ही तुमच्या घराशेजारी लावली तर सापांचा धोका कमी होतो. या झाडांमुळे साप तुमच्या घरापासून लांब राहू शकतात. 

ह्या झाडांची लागवड केल्यास सापांचा धोका कमी होतो 

रान तुळशी : रान तुळशी ही एक अशी औषधी वनस्पती आहे जिचा वापर हवा शुद्ध करण्यासाठी आणि सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. महत्त्वाची बाब अशी की औषधी वनस्पतीला एक तिखट वास असतो जो की सापांना दूर ठेवतो.

या वनस्पतीचा वास सापांना अजिबात आवडत नाही यामुळे तुम्ही तुमच्या घराच्या शेजारी या वनस्पतीची लागवड केल्यास सापांचा धोका कमी होणार आहे. 

वर्मवूड : अंगणामध्ये, बाल्कनीमध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वारा जवळ तुम्ही एखाद्या कुंडीत या वनस्पतीची सहज लागवड करू शकता. या वनस्पतीला तुम्ही सजावटीच्या वनस्पतीऐवजी लावले पाहिजे कारण या वनस्पतीचा वास सापांना आवडत नाही. ही वनस्पती कुंडीतही वाढते यामुळे तुम्ही तुमच्या टेरेसवर सुद्धा ही वनस्पती ठेवू शकता. 

लसूण : लसूण हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. आपल्याकडे लसणाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हा मसाल्याचा पदार्थ औषधी वनस्पती म्हणूनही वापरला जातो शिवाय लसूण ही एक अशी वनस्पती आहे जी की सापांना दूर ठेवते.

लसुणमध्ये सल्फोनिक एसिड आढळते त्यामुळे एक तीव्र वास येतो जो की सापांना अजिबात आवडत नाही. म्हणून या वनस्पती पासून साप लांब राहतात. 

पुदिना : पुदिना देखील एक औषधी वनस्पती आहे आणि या वनस्पतीपासून एक तीव्र वास येतो. हा तीव्र वास सुद्धा सापांना अजिबात आवडत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या बाल्कनीच्या कुंडीत, अंगणात किंवा परस बागेमध्ये या वनस्पतीची लागवड करायला काही हरकत नाही. या वनस्पतीची लागवड केल्यास सापांचा धोका नक्कीच कमी होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!