Snake Viral News : साप पाहताच क्षणी आपल्या अंगाचा थरकाप ऊडत असतो. आपण सर्वजण सापांना मोठ्या प्रमाणात घाबरतो. कारण म्हणजे भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार देशात दरवर्षी जवळपास एक लाख लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होत असतो. हेच कारण आहे की साप दिसल्याक्षणी आपण खूपच घाबरतो.
पण साप दिसला म्हणून लगेचच त्याला मारायला धावू नये कारण असे करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय सापांना मारणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फारच चुकीचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सापांचे संवर्धन होणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच घरात किंवा अंगणात साप दिसला की सर्वप्रथम आपण सर्पमित्रांना पाचारण केले पाहिजे आणि अंगणात तसेच घरात असणारा साप जंगलात सोडणे आवश्यक आहे.

दरम्यान जर तुम्हालाही सापांची भीती वाटत असेल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख कामाचा राहणार आहे. खरे तर निसर्गातील काही झाडांकडे आपसूक आकर्षित होतात. अशा परिस्थितीत जर ही झाडे आपल्या घराच्या अंगणात असतील तर या झाडांकडे साप आकर्षित होऊन आपल्या घरात घुसण्याची शक्यता अधिक वाढत असते. यामुळे अशा झाडांची आपल्या घराशेजारी किंवा अंगणात लागवड करू नये असा सल्ला दिला जातो. दरम्यान आज आपण कोणत्या झाडांकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात याची माहिती पाहणार आहोत.
या झाडांकडे साप आकर्षित होतात
लँटाना वनस्पती : ही वनस्पती एक शोभेची वनस्पती आहे आणि अंगणात शोभून दिसते. या वनस्पतीला लागणारी फुले फारच आकर्षक असतात अन यामुळे अनेक जण या शोभेच्या झाडाची आपल्या अंगणात लागवड करण्याचा निर्णय घेतात. मात्र या शोभेच्या झाडामुळे घरात साप घुसण्याची शक्यता अधिक असते आणि हेच कारण आहे की ही वनस्पती घराशेजारी लावू नये असा सल्ला तज्ञ देतात.
खरे तर या वनस्पतीला लागणारी फुले फारच आकर्षक असतात आणि याच आकर्षक रंगांमुळे साप या फुलांकडे आकर्षित होतात. या झाडाला लागणारी दाट पाने सापांना लपण्यासाठी आसरे देतात आणि यामुळेच या झाडांजवळ साप निघण्याचे प्रमाण अधिक असते.
गोकर्णी वेल : आपल्यापैकी अनेकांच्या घराच्या अंगणात किंवा परसदारी गोकर्णी चे वेल असेल. खरे तर हे वेल दिसायला जेवढे सुंदर असते तेवढेच हे वेल गुणकारी सुद्धा आहे. या वेलाची पाने आणि फुले औषधी असतात. आयुर्वेदामध्ये या वेलाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
या वेलाला लागणारी फुले आकर्षक असतात शिवाय या फुलांचा अनेक आजारांमध्ये उपयोग केला जातो. अनेक जण या फुलांचा चहा सुद्धा बनवतात. या झाडाला लागणारी निळे फुले सापांना आकर्षित करतात आणि पाने सापांना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. यामुळे या झाडाची परसदारी किंवा अंगणात लागवड करणे टाळणे आवश्यक आहे.
चाफा : चाफा ही अशी वनस्पती आहे जी की खूपच सुंदर दिसते आणि चाफ्याच्या झाडाचे फुल फारच सुगंधी असते. यामुळे अनेक जण आपल्या अंगणात किंवा परसदारी चाफ्याच्या झाडाची लागवड करतात. मात्र या झाडाचा सुगंध आणि झाडाला लागणारी पाने सापांना आपल्याकडे आकर्षित करतात. या झाडांना दाट पाने येतात आणि या पानांमध्ये साप लपून बसतात. यामुळे चाफ्याचे झाड घराच्या अंगणात किंवा परसदारी लावणे टाळावे असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.