सापाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ‘ही’ वस्तू ! तुमच्या घरात ‘ही’ वस्तू आवर्जून ठेवा साप घरात चुकूनही येणार नाही

उन्हाळ्यातही साप मोठ्या प्रमाणात बिळा बाहेर पडतात. खरे तर भारतात काही बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या जाती विषारी आहेत. देशात मण्यार, फुरसे, घोणस, आणि ज्याला आपण कोब्रा म्हणतो तो नाग या चार जाती सर्वात जास्त विषारी आहेत.

Published on -

Snake Viral News : पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी शिरते आणि त्यामुळे साप मोठ्या प्रमाणात बिळाबाहेर पडतात. म्हणूनच या काळात सर्पदंशाच्या घटना अधिक पाहायला मिळतात. फक्त पावसाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही अशीच परिस्थिती राहते. उन्हाळ्यातही साप मोठ्या प्रमाणात बिळा बाहेर पडतात.

उन्हाळ्यात अन्नाच्या शोधात साप मानवी वस्तीमध्ये सुद्धा घुसू शकतात. यामुळे उन्हाळ्यातही पावसाळ्याप्रमाणेच साप चावल्याच्या घटना कानावर ऐकायला येतात. खरे तर भारतात काही बोटावर मोजण्याइतक्याच सापांच्या जाती विषारी आहेत.

मात्र असे असतानाही देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या फारच मोठी आहे. एका आकडेवारीनुसार देशात सर्पदंशामुळे दरवर्षी जवळपास 58 हजार लोक मरण पावतात.

देशात मण्यार, फुरसे, घोणस, आणि ज्याला आपण कोब्रा म्हणतो तो नाग या चार जाती सर्वात जास्त विषारी आहेत. या जातीचा साप चावला अन वेळेत उपचार घेतले गेले नाही तर मरण अटळ आहे.

यामुळे साप चावला की ताबडतोब रुग्णालयात जाऊन उपचार घेणे सर्वात बेस्ट ठरते. दरम्यान जर तुम्ही ही जंगलात शेतात किंवा जंगलानजीक राहत असाल आणि तुमच्या घरात साप निघण्याची भीती तुम्हाला सतत भेडसावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण साप येऊ नये यामुळे घरात कोणती वस्तू असायला हवी याबाबत माहिती पाहणार आहोत. खरे तर साप दिसला की आपण सर्वजण घाबरतो. मात्र साप सुद्धा काही वस्तूंना घाबरत असतो.

ही वस्तू घरात असेल तर साप आजुबाजूलाही फिरकणार नाही

आपल्या जंगलात अशा काही वनस्पती आहेत, ज्या वनस्पतींच्या वासामुळे साप त्या परिसरात देखील फिरकत नाहीत. मारुआडोना नावाची वनस्पती अशीच एक आहे, जी की सापांना अजिबात आवडत नाही. मारुआडोना वनस्पतीला काही ठिकाणी वेगळ्या नावाने सुद्धा ओळखले जाते.

ग्रामीण भागांमध्ये या वनस्पतीला रान तुळस म्हणून ओळखतात. या वनस्पतीला तीव्र वास असतो, याच वासामुळे साप घरात घुसत नाहीत. ग्रामीण भागात काही लोक या वनस्पतीच्या फांद्या तोडून आपल्या घरात आणि जनावरांच्या गोठ्यात ठेवतात.

गावांमध्ये जनावरांना देखील सर्पदंश होण्याची भीती असते. आणि यामुळे जनावर गंभीर स्थितीत सापडतो. पण जर तुम्ही ही वनस्पती लावली किंवा याच्या फांद्या गोठ्यात, घरात ठेवल्या तर याच्या वासामुळे साप आसपास देखील फिरकणार नाहीत.

या वनस्पतीची पान वाळवून आपल्या घरात ठेवली तरी साप तुमच्या घरात घुसू शकणार नाही कारण की या वनस्पतीच्या पानांचा वास किमान एक वर्षभर तरी येत राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News