Snake Viral News : पावसाळा संपलाय पण पावसाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ऐन दिवाळीत पावसाने धुमाकूळ घातला आहे. नाशिक जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे सावट पाहायला मिळत असून पावसामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल आहे.
दिवाळीच्या दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली असल्याने सर्वसामान्यांच्या दिवाळीवर विरजन पडले आहे. त्याचवेळी यामुळे शेती पिकांना देखील मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काढणीच्या अवस्थेत असणाऱ्या शेती पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.

दरम्यान पुन्हा एकदा राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले असल्याने आता सापांचा धोका पुन्हा एकदा वाढणार आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बिळात पाणी शिरते आणि यामुळे साप बिळाबाहेर पडतात आणि मानवी वस्तीमध्ये घुसण्याची शक्यता असते.
हेच कारण आहे की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्पद अंशाच्या घटना आपल्याला ऐकायला आणि पाहायला मिळतात. दरम्यान जर तुम्हालाही सापांचा धोका वाटत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे.
कारण की आज आपण अचानक तुमच्या घरात हात घुसला तर काय करायला हवे, नेमक्या काय उपाययोजना करता येऊ शकतात याबाबत माहिती पाहणार आहोत. घरात साप घुसला तर पॅनिक न होता सर्वप्रथम सर्प मित्राला फोन लावा. सर्पमित्र येत नाही तोपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर थांबायला हवे.
दरम्यान जर साप अडगळीच्या ठिकाणी घुसला असेल, सर्पमित्र यायला थोडा उशीर होत असेल तर तुम्ही घरात धूर करू शकता, धूर केल्याने साप दूर पळतो. या व्यतिरिक्त आणखी एक प्रभावी उपाय आहे तो म्हणजे तुम्ही लिंबाचा रस, व्हिनेगर आणि दालचीनीचं तेल यांचं मिश्रण करून जिथे साप घुसला आहे तिथे स्प्रे करा.
तुम्ही जर तुमच्या घराच्या आजूबाजूला हा स्प्रे मारला तर साप सुकूनही तुमच्या घरात घुसणार नाही किंवा परिसरात जिथे साप असेल तिथून तो निघून जाईल. याशिवाय साप दूर पळवण्याचा आणखी एक उपाय आहे.
तो म्हणजे लवंग आणि दालचिनीच्या तेलाचा स्प्रे करणे. हे तेल पाण्यात मिसळून स्प्रे केल्यास साप चुकूनही येणार नाही. तसेच जर तिथे साप आधीपासूनच असेल तर तो दूर पळून जाईल.