Snake Viral News : सध्या नैऋत्य मान्सूनमुळे सगळीकडे अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. मात्र या पावसाळ्याच्या कालावधीत सापांचा धोका देखील प्रचंड वाढत असतो. खरे तर भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आहेत मात्र त्यातील बहुतांशी प्रजाती बिनविषारी आहे. भारतात आढळणाऱ्या सापांच्या प्रजातींपैकी काही बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती विषारी आहेत.
पण असे असतानाही देशात सर्पदंश आणि मरण पावणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. मीडिया रिपोर्ट नुसार भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे जवळपास 80 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. अशा स्थितीत सापांपासून लांब राहिलेले कधीही चांगले.

साप विषारी असो किंवा बिनविषारी त्यापासून नेहमी लांब राहिले पाहिजे. तसेच सापांना मारण्याचा प्रयत्न देखील केला नाही पाहिजे. कारण की बहुतेक प्रकरणांमध्ये सापांना मारण्याचा प्रयत्न करतानाच सर्पदंशाची घटना घडलेली आहे.
दरम्यान पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जर तुम्हालाही सापांचा धोका वाटत असेल, तुमच्याही घरात साप घुसलेला अशी भीती तुम्हाला वाटत असेल तर आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे.
कारण की आज आपण प्रत्येकाच्या घरात आढळणाऱ्या दोन अशा पदार्थांची माहिती पाहणार आहोत ज्याच्या उपयोगातून तुम्ही सापांची भीती दूर करू शकता. हे असे पदार्थ आहेत ज्याच्या वासामुळे साप नेहमीच लांब राहतो. यापैकी एका पदार्थाची किंमत फक्त पाच ते दहा रुपये इतकी आहे.
हे पदार्थ सापांना ठेवतात दूर
कापूर : हिंदू धर्मीय लोकांच्या घरातील देवघरांमध्ये अगरबत्ती आणि कापूर तुम्हाला हमखास पाहायला मिळेल. धूप, अगरबत्ती, कापूर यांचा उपयोग पूजेसाठी केला जातो. देवघरात आढळणारे हेच कापूर तुम्हाला सापांपासून संरक्षण देऊ शकते.
खरतर आपण देवघरातील देवांची पूजा करताना, आरतीच्या वेळी कापूर जाळत असतो. यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव नाहीसा होतो. कापूर पेटवल्याने घरात सर्वत्र सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. एवढेच नाही तर कापुराचा सुगंध हा घरातील वातावरण एकदम अल्हाददायक बनवतो.
विशेष म्हणजे कापूर पेटवल्यानंतर जो वास येतो तो वास सापांना आवडत नाही. कापूर पेटवल्यामुळे साप घरात घुसण्याची भीती नाहीशी होते. सोबतच जर घरात साप घुसून बसलेला असेल तर कापूर पेटवल्यामुळे तो बाहेर निघू शकतो.
केरोसीन : आधी सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानातून केरोसीनचे वाटप केले जात असे. मात्र आता रेशन दुकानात केरोसीन मिळत नाही. पण जर तुमच्याकडे केरोसीन असेल तर तुम्ही केरोसीन म्हणजेच रॉकेलचा वापर करून सापांपासून संरक्षण मिळवू शकता.
असे सांगितले जाते की रॉकेलंचा वास सापांना अजिबात आवडत नाही आणि यामुळे जर घरात ज्या ठिकाणी साप घुसण्याची भीती वाटते त्या ठिकाणी जर रॉकेल शिंपडले तर सापांचा धोका बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता असते.