Snake Viral News : भारतात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. हेच कारण आहे की साप दिसला तरीही आपला थरकाप उडत असतो. खरे तर भारतात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यातील काही प्रजाती या फारच विषारी आहेत तर काही प्रजाती या बिनविषारी देखील आहेत. खरे तर, आपल्या देशात जेवढ्या सापांच्या प्रजाती आढळतात त्यातील बहुतांशी साप हे बिनविषारीच आहेत.
मात्र काही प्रजाती या विषारी आहेत. यामध्ये कोब्रा अर्थात नागाचा देखील समावेश होतो. पण, आपल्या भारतात सापांबाबत अनेक दंतकथा देखील प्रसिद्ध आहेत. यामुळे सापांविषयी आपल्याकडे अनेक गैरसमज देखील तयार झालेले आहेत. परंतु, साप हा पर्यावरणासाठी महत्त्वाचा आहे.

यामुळे सापांचे संवर्धन होणे जरुरी आहे. अलीकडे सापांच्या अनेक जाती नामशेष झाल्या आहेत. पण आज आपण भारतातील अशा एका जिल्ह्याची माहिती जाणून घेणार आहोत जिथे सापांची संख्या ही सर्वात जास्त पाहायला मिळते. या जिल्ह्याला सापांचा जिल्हा अन नागांचा अड्डा असेही म्हणतात.
छत्तीसगड राज्यातील जशपूर जिल्हा हा ‘सापांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जातो. या भागात विविध प्रजातींचे साप मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे येथे जाणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिकांनी विशेष सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
जशपूर जिल्ह्यात घनदाट जंगल, डोंगराळ भाग आणि भरपूर जलस्रोत असल्याने येथे सापांसाठी अनुकूल पर्यावरण आहे. कोब्रा, करैत, वायपर, धामण आणि अजगर यांसारख्या सापांच्या अनेक जाती येथे आढळतात. काही साप विषारी असून, त्यांच्या दंशामुळे गंभीर दुखापत होऊ शकते.
छत्तीसगड राज्यातील जशपूर जिल्ह्याला नागांचा अड्डा असे सुद्धा म्हणतात कारण की येथे नागांची संख्या सर्वात जास्त आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर छत्तीसगड राज्यातील या वैविध्यपूर्ण जिल्ह्यात सापांच्या तब्बल 30 जाती आढळतात. सापांच्या जवळपास 30 जाती या जिल्ह्यात पाहायला मिळतात आणि या विविध जातींच्या सापांची संख्या येथे फारच अधिक आहे.
या ठिकाणी ज्या सापांच्या जाती आढळतात त्यातील काही जाती विषारी आहेत. तर बहुतांशी जाती या बिनविषारी वर्गातील आहेत. हा जिल्हा नैसर्गिक सौंदर्य, घनदाट जंगल आणि जैवविविधतेसाठी संपूर्ण देशात ख्यातनाम आहे. यासोबतच येथे आढळणाऱ्या विविध सापांच्या जाती सुद्धा या जिल्ह्याला एक वेगळी ओळख देतात.
येथील सापांची संख्या ही देशातील इतर भागांपेक्षा सर्वात जास्त आहे. मात्र असे असले तरी सर्वात जास्त साप आढळणाऱ्या टॉपच्या राज्यांच्या यादीत छत्तीसगड राज्याचा समावेश होत नाही. सर्वाधिक साप आढळणाऱ्या राज्यांच्या बाबत बोलायचं झालं तर केरळ हे राज्य पहिल्या क्रमांकावर येते. केरळ राज्यात सर्वात जास्त साप आढळत असल्याची नोंद करण्यात आली आहे.