Solapur – Goa Flight : सोलापूर ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. लवकरच सोलापूर होऊन गोव्याला जाणे सोयीचे होणार आहे. गोवा हे एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ. या ठिकाणी पर्यटकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते. सोलापूर येथूनही दरवर्षी हजारो लोक गोव्याला पिकनिक साठी जातात.
याशिवाय व्यवसाय निमित्ताने सोलापूर ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. अशा परिस्थितीत सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, याच मागणीच्या अनुषंगाने मध्यंतरी सोलापूरहून तीन महत्त्वाच्या शहरांसाठी विमान सेवा सुरू केली जाईल अशी माहिती समोर आली होती.

सोलापूर ते गोवा सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते हैदराबाद या तीन शहरांसाठी विमान सेवा सुरू होणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. यामुळे सोलापूरकरांच्या माध्यमातून सातत्याने या विमानसेवेच्या बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आता याच संदर्भात एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यात आधी सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू केली जाणार आहे.
कधी सुरू होणार विमानसेवा
मीडिया रिपोर्टनुसार 26 मे 2025 पासून सोलापूर गोवा विमान सेवेचा श्री गणेशा होणार आहे. सोलापूर ते गोवा, सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते हैदराबाद अशा तीन विमानसेवा सुरू होणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. मात्र तूर्तास सोलापूर ते गोवा यादरम्यानच विमानसेवा चालवण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून यावेळी समोर आली आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सोलापूर गोवा विमान सेवा 26 मे पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास वेगवान होणार असून त्यांना जलद गतीने गोव्याला पोहोचता येणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, फ्लाय 91 या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.
खरेतर, मागील काहीं वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. त्यावेळी भाजपामधील अनेक मंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील आश्वासन सुद्धा दिले होते. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल, असे सांगितले होते. यानुसार, आता 26 मे पासून सोलापूर गोवा विमान सेवेचा प्रारंभ होणार आहे.