मागेल त्याला सौर कृषी पंप योजना : शेतात सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात? वाचा….

Published on -

Solar Pump Yojana : भारत हा शेतीप्रधान देश. कारण देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या प्रत्येक सेवा अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित उद्योगधंद्यांवर आधारित. आज भारत जलद गतीने विकसित होणारा देश बनलाय. देशाचे अर्थव्यवस्था ही जपानला ओव्हरटेक करत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय.

महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काळात भारत हा चायना सारख्या विशाल अर्थव्यवस्थेला टक्कर देण्याची क्षमता ठेवतो असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलेला आहे. दरम्यान भारत जी नेत्र दीपक कामगिरी करताना दिसतोय त्या कामगिरीमध्ये शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच शेती क्षेत्रा आणखी बळकट व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचे दिसते. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. दरम्यान आज आपण केंद्र शासनाच्या अशाच एका महत्त्वाकांक्षी योजनेची माहिती पाहणार आहोत.

आज आपण मागील त्याला सौर कृषी पंप योजनेबाबत माहिती पाहूयात. ही योजना केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून याअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवून दिला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून राज्यात या योजनेला जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. यामुळे खानदेश असो की पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ असो की मराठवाडा सगळीकडे शेतात सौर कृषी पंप नजरेस पडतात.

वीजटंचाई, भारनियमन आणि वाढत्या वीजदरांच्या पार्श्वभूमीवर ही योजना शेतकऱ्यांसाठी एक गेम चेंजर योजना ठरत असून याचा मोठा फायदा अशा भागातील शेतकऱ्यांना होतोय जिथे विजेची नेहमीच समस्या असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी ३ एचपी, ५ एचपी आणि ७ एचपी क्षमतेचे सोलर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कॅटेगरीनुसार ९० ते ९५ टक्के इतके अनुदान दिले जात आहे. अशा स्थितीत आता आपण या योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांना नेमकी किती रक्कम भरावी लागते याबाबतचे कॅल्क्युलेशन येथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेतकऱ्यांना किती पैसे भरावे लागतात?

या योजनेतून जवळपास ९० -९५ टक्के अनुदान सरकारकडून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सोलर पंपासाठी केवळ ५ ते १० टक्के रक्कम स्वतः भरावी लागते. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५% अनुदान उपलब्ध करून दिले जात असून त्यांना फक्त ५ टक्के रक्कम भरावी लागते. उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे अनुदानाच्या स्वरूपात भरते. सध्या या योजनेसाठी अर्जप्रक्रिया सुरू असून पात्र शेतकरी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागते. ही रक्कम भरल्यानंतरच सोलर पंप बसवण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू केली जाते. पंपाची किंमत आणि शेतकऱ्यांनी भरायची रक्कम ही पंपाच्या क्षमतेनुसार बदलते. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना ३ एचपी क्षमतेच्या सोलर पंपासाठी सुमारे १७ हजार ५०० ते १८ हजार रुपये भरावे लागतात.

५ एचपी पंपासाठी सुमारे २२ हजार ५०० रुपये आणि ७ एचपी क्षमतेच्या पंपासाठी सुमारे २७ हजार रुपये भरावे लागतात. ही रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे अल्प व मध्यम भूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा मोठा फायदा होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एससी आणि एसटी कॅटेगिरी मधील शेतकऱ्यांना यापेक्षा कमी पैसा भरावा लागतो कारण की त्यांना ९५ टक्के अनुदान मिळते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News