Solar Panel : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे पार कंबरडे मोडले आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता अक्षरशः बेजार झाली आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत.
या सोबतच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये ही सातत्याने वाढ होत आहे. एवढेच नाही तर वीज बिल देखील अलीकडे मोठ्या प्रमाणात येत आहे. वाढीव वीज बिलामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत.

वाढीव वीजबूलामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या माध्यमातून आता त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जात आहेत. दरम्यान जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
आज आपण घराच्या छतावर सोलर पॅनल बसवताना त्याची क्षमता कशी ठरवायची? दोन बीएचके घरासाठी किती क्षमतेचा सोलर पॅनल इंस्टॉल करणे आवश्यक आहे याच बाबतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
दोन बीएचके घरासाठी किती क्षमतेचा सोलर पॅनल बसवावा लागणार?
मीडिया रिपोर्ट नुसार एक सर्वसामान्य टू बीएचके घरासाठी मासिक 80 ते 250 युनिट एवढी वीज लागते. मात्र जर घरात विजेवर चालणारे उपकरणांची संख्या अधिक असेल तर यापेक्षा जास्त युनिट वीज खर्च होऊ शकते.
विशेषता ज्या घरात जास्त एसीचा वापर होत असेल तिथे एका महिन्यात तीनशे युनिटपर्यंत वीज लागत असेल. पण जर समजा एखाद्या दोन बीएचके घरात दरमहा 240 युनिट एवढी वीज खर्च होत असेल तर अशा घरासाठी दोन किलो वॅट सोलर सिस्टम ची आवश्यकता भासणार आहे.
भारतातील एक किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल जवळपास दरमहा 120 युनिट पर्यंत वीज तयार करू शकते. म्हणजेच दोन किलो वॅट क्षमतेचे सोलर पॅनल दरमहा जवळपास 240 युनिट पर्यंत वीज तयार करणार आहे.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे दोन किलो वॅट क्षमतेचे सोलर सिस्टम बसवण्यासाठी साधारणता किती पॅनल इंस्टॉल करावे लागतील. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या बाजारात 320 वॉट क्षमता असणारे सोलर पॅनल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
म्हणजेच जर दोन किलोवॅट क्षमतेची सिस्टम इन्स्टॉल करण्यासाठी जवळपास सहा ते सात सोलर पॅनल बसवावे लागणार आहेत. यासाठी 200 ते 300 चौरस फूट जागा देखील लागणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे दोन किलो वॅट सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी शासनाकडून जवळपास 60000 रुपयांचे अनुदान सुद्धा मिळणार आहे.