Soybean Farming : आपल्या राज्यात सोयाबीन या तेलबिया पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार, राज्यात देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन घेतले जाते. सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत राज्याचा देशात दुसरा क्रमांक लागतो.
विशेषता गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वधारत आहे. यंदा मात्र गेल्या हंगामात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळाला नसल्याने लागवडीखालील क्षेत्रात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
परंतु मराठवाडा आणि विदर्भ या प्रमुख सोयाबीन उत्पादक विभागांमध्ये यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाईल असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसात राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती
साहजिकच आता पीक पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होणार आहे. यामध्ये सोयाबीन पीक पेरणीसाठी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे सरसावणार आहेत. अशातच, सोयाबीन पिकाची पेरणी करताना शेतकऱ्यांना मात्र काही गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन पिकाची पेरणी करताना जर शेतकरी बांधव घरचे बियाणे वापरत असतील तर त्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी करणे जरुरीचे आहे.
एवढेच नाही तर काही तज्ञांनी जरी शेतकरी बांधव कंपनीचे बियाणे वापरत असतील तरी देखील त्याची बियाणे उगवण क्षमता तपासून घ्यावी जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन सोयाबीन पिकातून मिळवता येईल असा सल्ला दिला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव घरच्या घरी कशा पद्धतीने सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चेक करू शकतात या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….
गोणपाटचा वापर करून अशी तपासा बियाणे उगवण क्षमता
यासाठी सर्वप्रथम गोणपाटचे सहा तुकडे घ्या. यानंतर बियाण्याच्या सर्व पोत्यांमधून बियाणे घ्या. बियाणे घेताना बियाणे पोत्याच्या आतमधून घ्या. यानंतर गोणपाटाचा तुकडा ओला करून घ्या. मग एका गोणपाटाच्या तुकड्यावर 100 दाणे मोजून दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा दहा च्या ओळीमध्ये बियाणे ठेवा.
अशा पद्धतीने एकूण तीन गोणपटाच्या तुकड्यावर एकूण 300 दाण्याचे तीन नमुने तयार करून घ्यावेत. यानंतर मग प्रत्येक गोणपाटाच्या तुकड्यावर आणखी एक तुकडा ठेवा. यावर पाणी शिंपडा आणि या नमुन्यांची गुंडाळी करून सावलीच्या ठिकाणी ठेवा. यावर अधून मधून पाणी शिंपडत राहा. सहा ते सात दिवसानंतर ही गुंडाळी उघडा.
मग या मधील अंकुरलेल्या बियाण्यांची संख्या मोजा. जर शंभर पैकी 70 दाणे अंकुरलेले असतील तर बियाणे उगवण क्षमता 70 टक्के आहे असे समजावे. 70 टक्के बियाणे उगवण क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी अधिक योग्य असते. मात्र 60% पेक्षा कमी उगवणक्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी योग्य नसते.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा
या पद्धतीने पाच ते सहा मिनिटात तपासा बियाणे उगवण क्षमता
शेतकरी बांधव सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता पाच ते सहा मिनिटात देखील तपासू शकतात. यासाठी बियाण्याच्या पोत्यांच्या आतमधून बियाणे घ्यावे. जेवढी बियाण्याची पोती असतील त्या सर्वांमधील सोयाबीनची दाणे काढावीत. यानंतर मग यामधून 100 दाणे घ्यावीत. 100 दाण्याची असे एकूण तीन संच तयार करावे. मग काचेचे तीन ग्लास घ्यावेत.
त्यामध्ये पाणी टाकावे. यानंतर या तिन्ही ग्लासात प्रत्येकी 100-100 दाणे टाकावेत. पाच ते सहा मिनिटे दाणे पाण्यातच राहू द्यावीत. सहा मिनिटानंतर ग्लासातले पाणी फेकून द्यावे दाणे वेगळे करावेत. यानंतर मग पूर्णपणे फुगलेले दाणे आणि टरफल्यावर सुरकुते पडलेले दाणे वेगळे करावेत.
यामध्ये जें दाने पूर्णपणे फुगलेले असतात ते पेरणीसाठी योग्य नसतात. यामुळे ज्या दाण्यांच्या टरफल्यावर सुरकुत्या पडलेल्या आहेत त्यांची संख्या मोजावी. सरासरी 70 टक्के दाणे टरफल्यावर सुरकुत्या पडलेले असतील तर असे बियाणे पेरणीसाठी चांगले आहे असे समजावे.
हे पण वाचा :- पीएम कुसुम योजना : 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप हवा असेल तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, इथं करा अर्ज