Soybean Farming : सोयाबीन हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक असून या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लागवड होते. हे पीक राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादित होते. मध्य महाराष्ट्रात सुद्धा या पिकाची कमी अधिक प्रमाणात लागवड पाहायला मिळते.
मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी येणारा खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नसल्याचे बोलले जात आहे. एक तर सोयाबीन पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत चालले आहे आणि दुसरे म्हणजे उत्पादित झालेल्या महालाला बाजारात अपेक्षित दरही मिळत नाहीये.

यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. गेल्या अडीच तीन वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकावा लागत असल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान यंदाही सोयाबीनचा हंगाम सुरू झाला असून मालाला अद्याप तरी अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
यामुळे यंदाही शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून शासकीय हमीभावात एम एस पी वर सोयाबीनची विक्री करावी लागणार आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून शासकीय हमीभावाची खरेदी कधी सुरू होणार हा सवाल कायम आहे. अशातच आता या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
शासकीय हमीभावात सोयाबीनची खरेदी नेमकी कधी सुरू होणार या संदर्भात सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. यावर्षी केंद्रातीप सोयाबीनला 5 हजार 328 रुपये MSP अर्थातच हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान आता शासकीय हमीभावात सोयाबीन खरेदीचा प्रारंभ होणार आहे.
नाफेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये आधारभूत किमतीत सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीनची सरकारी खरेदी करण्यात येणार आहे. राज्यातील सर्वचं जिल्ह्यांत खरेदी केंद्रांची उभारणी सुरू झाली आहे.
तसेच याची प्रक्रिया आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहचली आहे. यामुळे नोव्हेंबर मध्ये शासकीय खरेदी सुरु होणार असे सांगितले जात आहे. नक्कीच नाफेडच्या खरेदीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.