आनंदाची बातमी ! सोयाबीनची 8,000 रुपयांकडे वाटचाल, इथं मिळाला विक्रमी भाव, यंदा पिवळं सोन 10,000 टप्पा गाठणार ?

Soybean Farming : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे यंदा प्रथमच सोयाबीनच्या दरात थोडीशी तेजी पाहायला मिळाली आहे. गेल्या दोन – तीन वर्षांपासून सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी डोईजड ठरत आहे.

पिकासाठी आलेला खर्च सुद्धा शेतकऱ्यांना भरून काढता येत नाही ही वास्तविकता आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक जण पर्यायी पिकाच्या शोधात आहेत तर काहींनी पर्याय पीक शोधले सुद्धा आहे.

सोयाबीन ऐवजी आता अनेक जण इतर पिकांकडे वळले आहेत. पण आजही विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जनता सोयाबीनवरच अवलंबून आहे. तरीही यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र किंचित कमी झाले असून असे असतानाही सुरुवातीच्या टप्प्यात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नव्हता.

पण आता सोयाबीनला हमीभावापेक्षा खुल्या बाजारात अधिक दर मिळत असून यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनच्या बाजारभावात किंचित सुधारणा दिसली.

आज राज्यातील काही एपीएमसी मध्ये गुणवत्ता पूर्ण मालाला 7000 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला आणि यामुळे शेतकरी बांधव सध्या समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.

अकोला, लातूर तसेच वासिम सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीन चांगलेच कडाडलेले पाहायला मिळाले. दरम्यान आता आपण आज सोयाबीनला सर्वाधिक भाव कोणत्या बाजारात मिळाला याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

इथे मिळाला विक्रमी भाव  

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती – आज या मार्केटमध्ये पिवळं सोन सर्वात महाग विकलं गेलंय. या बाजारात सोयाबीनला कमाल 7330 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 6500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. परंतु किमान भाव तीन हजार 925 रुपये एवढा होता. या बाजारात आज साडेचार हजार क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती – इथं पिवळ्या सोयाबीनची 4602 क्विंटल आवक झाली. यातील गुणवत्ता पूर्ण मालाला 5720 रुपये प्रतिक्विंटल असा कमाल भाव मिळाला. सरासरी भाव 5 हजार 555 रुपये प्रति क्विंटल असा होता. तसेच किमान 4000 रुपये प्रति क्विंटल या दराने सोयाबीनची विक्री झाली. 

थोडक्यात गुणवत्तापूर्ण मालाला सध्या बाजारात चांगला भाव मिळतोय. पण फारच कमी बाजारांमध्ये सोयाबीनचे रेट चांगले आहेत. आजही अनेक ठिकाणी सोयाबीनचे रेट हमीभावा पेक्षा कमी आहेत.

मात्र येत्या काळात सोयाबीनचे भाव वाढतील अशी आशा सगळ्यांनाच आहे. त्यामुळे आता नजीकच्या भविष्यात सोयाबीनला काय भाव मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.