Soybean Market : अखेर सोयाबीन बाजार भावात मोठी वाढ, ‘या’ बाजारात मिळाला सर्वाधिक भाव

Soybean Market : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बऱ्याच दिवसानंतर आज पहिल्यांदाच सोयाबीन बाजारात थोडी तेजी पाहायला मिळाले आहे.

मराठवाड्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला आज समाधानकारक भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षी सोयाबीनचा हंगाम नेहमीप्रमाणे विजयादशमीपासून सुरू झाला.

विजयादशमीनंतर हळूहळू बाजारात सोयाबीनचे आवक वाढू लागले मात्र बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. पण आता खुल्या बाजारातील चित्र हळूहळू बदलू लागले आहे.

राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीनला समाधानकारक दर मिळू लागला आहे. यावर्षी मान्सून काळात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कमी दिवसात जास्त पाऊस झाला. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि यामुळे खरिपातील बहुतांशी पिकांचे नुकसान झाले.

सोयाबीन पिकाचे देखील अनेक ठिकाणी नुकसान झाले. यामुळे उत्पादनात मोठी घट आली. एकीकडे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली तर दुसरीकडे बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नव्हता.

त्यामुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक चिंताग्रस्त पाहायला मिळालेत. पण शुक्रवारी बाजारातील चित्र थोडे बदलले. मराठवाड्यातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच सोयाबीनचे दर 5000 रुपयांपेक्षा अधिक झालेत.

शुक्रवारी झालेल्या लिलावात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला कमाल 5,100 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला असल्याची नोंद राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात आली.

खरे तर हंगाम सुरू झाल्यापासून सोयाबीनचे दर साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल च्या आसपास राहिलेत. यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्री करण्याऐवजी साठवणूक करण्याला प्राधान्य दिले. याचाच परिणाम म्हणून बाजारांमध्ये सोयाबीनची आवक घटली आणि साहजिकच आवक कमी झाल्याने सोयाबीनचे बाजार भाव आता वाढू लागले आहेत.

काल , 26 डिसेंबर 2025 रोजी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल 5,100 रुपये आणि सरासरी 4,800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. आता आपण लातूर बाजारात सोयाबीनला गेल्या पाच दिवसांमध्ये कसा भाव मिळाला याचा आढावा घेऊयात. 

मागील पाच दिवसांमधील बाजारातील चित्र 

22 डिसेंबर 2025 रोजी सोयाबीनला कमाल 4913 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. 

23 डिसेंबर रोजी सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला.

24 डिसेंबर रोजी सोयाबीनला 4950 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

25 डिसेंबर रोजी सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.

26 डिसेंबर रोजी सोयाबीनला 5 हजार 100 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.