Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी समोर आली आहे वाशिम जिल्ह्यातून. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोन्याला सर्वाधिक भाव मिळाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती केली जाते. मराठवाडा आणि विदर्भ हे दोन विभाग सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत अग्रेसर आहेत.

मध्य महाराष्ट्रात सुद्धा कमी अधिक प्रमाणात अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड आपल्याला पाहायला मिळते. थोडक्यात काय तर सोयाबीन हे राज्यातील शेतकऱ्यांचे एक महत्त्वाचे पीक आहे आणि राज्यातील बहुतांशी शेतकरी याच पिकावर अवलंबून आहेत.
यामुळे शेतकऱ्यांची नेहमीच सोयाबीन बाजाराकडे नजर असते. मात्र गेल्या काही काळानुसार सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नाही कारण की महाराष्ट्रात सोयाबीनला अपेक्षित भाव मिळतं नाही.
शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीनच्या पीक उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात कपात आपल्याला पाहायला मिळते. हेच कारण आहे की या वर्षी सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे.
परिणामी उत्पादनात मोठी घट येणार अन याचा परिणाम बाजारभावावर सुद्धा दिसून येऊ शकतो आणि यंदा सोयाबीनला चांगला दर मिळेल अशी आशा आहे. अशातच आज वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला 6375 रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला आहे.
या बाजारात सरासरी दर देखील समाधानकारक राहिले आहेत. वाशिम एपीएमसी मध्ये आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी 5800 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे तर येथे किमान दर 4435 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला. आता आपण राज्यातील इतर काही बाजारांमधील परिस्थिती समजून घेऊयात.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : खानदेशातील या बाजारात आज सोयाबीनला सरासरी 5,328 रुपये एवढा भाव मिळाला.
नागपूर : विदर्भातील या बाजारात आज सोयाबीनला कमाल 5,125 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे. येथे सरासरी भाव 4943 रुपये होता.
लातूर : मराठवाड्यातील या बाजारात आज सोयाबीनला 5125 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि सरासरी 4950 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
जालना : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला सरासरी 5,355 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्याचे नोंद करण्यात आली.
उमरेड : या मार्केटमध्ये देखील आज सोयाबीनला कमाल 5,250 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. येथे सरासरी भाव 4850 होता.
मंगरूळपीर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला कमाल सहा हजार तीस आणि सरासरी 5600 असा भाव मिळाला.













