Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासाची बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे बाजार भाव चांगलेच कडाडले आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय. यावर्षी पहिल्यांदाच सोयाबीनचे भाव सात हजार रुपये प्लस झालेत.
काल वाशिम येथील मार्केटमध्ये सोयाबीनला सात हजार रुपयांपेक्षा अधिक भाव मिळाला. महत्वाची बाब म्हणजे आजही राज्यातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचे दर प्रचंड तेजीत आलेले आहेत आणि आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमधील सोयाबीनचे भाव कसे आहेत याबाबतचा आढावा घेणार आहोत.

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला चांगला दर मिळत असल्याने यंदा तरी सोयाबीन शेतकऱ्यांना चांगली कमाई करून देईल अशी भोळी भाबडी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. खरे तर यावर्षी सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र कमी झालेले आहे.
शिवाय अतिवृष्टीमुळे अनेक भागात सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला किमान नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळायला हवा अशी शेतकऱ्यांची आशा आहे. जर सोयाबीनला असा विक्रमी दर मिळाला नाही तर हे पीक शेतकऱ्यांना कदापि परवडणार नाही असे काही लोकांचे म्हणणे आहे.
दरम्यान आता गेल्या दोन दिवसांपासून पिवळे सोयाबीन तेजीत आले आहे. राज्यातील प्रमुख पाच बाजारांमध्ये सोयाबीनचे दर सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल च्या दरम्यान आहेत. सोयाबीनला या बाजारांमध्ये हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाला यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
या मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला विक्रमी दर
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती – या मार्केटमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला कमाल 7000 रुपये, सरासरी 6000 रुपये आणि किमान 3955 प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती – या मार्केटमध्ये आज सोयाबीनला कमाल 6300, सरासरी 6000 रुपये आणि किमान 5,500 असा भाव मिळाला.
वाशिम अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती – महाराष्ट्रातील या मार्केटमध्ये आज सोयाबीनला कमाल सहा हजार रुपये प्रति क्विंटल, सरासरी 5800 रुपये प्रति क्विंटल आणि किमान 3850 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती – महाराष्ट्रातील या मार्केटमध्ये आज सोयाबीनला कमाल सहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. तसेच या मार्केटमध्ये सोयाबीनला सरासरी 5450 रुपये आणि किमान 3885 रुपये असा दर मिळाला आहे.
दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती – या मार्केटमध्ये आज सोयाबीनला कमाल 6700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तसेच येथे सोयाबीनला सरासरी 6200 प्रति क्विंटल आणि किमान 3000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती – या मार्केटमध्ये सोयाबीनला कमाल 6,205 रुपये प्रति क्विंटल, सरासरी 6155 प्रति क्विंटल आणि किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती – या मार्केटमध्ये सोयाबीनला कमाल सहा हजार 111 रुपये आणि सरासरी 6 हजार 111 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.