डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सोयाबीनच्या रेट मध्ये झाली मोठी घसरण ! आज बाजारात काय भाव मिळाला? वाचा

Published on -

Soybean Rate : तुम्ही पण सोयाबीनची शेती करता का मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. खरे तर यावर्षी राज्यातील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र बऱ्यापैकी कमी झाले आहे. अनेकांनी सोयाबीन लागवडीकडे पाठ फिरवली आहे.

मात्र असे असले तरी मराठवाडा विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केलेली आहे. दरम्यान राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

खरे तर गेल्या दोन अडीच वर्षांपासून सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही आणि यामुळे राज्यातील शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. या हंगामात मात्र ही परिस्थिती बदलण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

कारण म्हणजे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र बऱ्यापैकी कमी झाले आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे सोयाबीन उत्पादनात सुद्धा मोठी घट आली. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज गुरुवारी सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले.

काही बाजारांत मोठ्या प्रमाणावर आवक झाली असली, तरी अपेक्षेप्रमाणे दरांमध्ये मोठी वाढ झालेली दिसून आली नाही. सध्या शेतकऱ्यांकडून विक्रीचा दबाव कायम असून, व्यापारी वर्ग मात्र दर्जानुसार निवडक खरेदी करत असल्याने बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर सरासरी पातळीवर स्थिरावले आहेत.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे गुरुवारी सोयाबीनची मोठी आवक नोंदवण्यात आली. तब्बल 4,674 क्विंटल सोयाबीन बाजारात दाखल झाले. येथे लोकल दर्जाच्या सोयाबीनला किमान 3,900 रुपये तर कमाल 4,350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

सर्वसाधारण दर 4,125 रुपये प्रति क्विंटल इतका राहिला. मोठ्या प्रमाणातील आवक असूनही दर फारसे घसरले नाहीत, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानली जात आहे. मात्र व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले की, चांगल्या दर्जाच्या मालालाच अपेक्षेप्रमाणे भाव मिळत आहे.

नागपूर बाजार समिती : येथे सोयाबीनची आवक तुलनेने कमी, म्हणजेच 85 क्विंटल इतकी नोंदवण्यात आली. येथे लोकल सोयाबीनला किमान 3,800 रुपये तर कमाल 4,430 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर 4,272 रुपये इतका राहिला.

नागपूर बाजारात तेल उतारासाठी योग्य आणि कोरड्या मालाला जास्त मागणी असल्याचे दिसून आले. मात्र ओलसर किंवा कमी प्रतीच्या सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

किनवट बाजार समिती : नांदेड जिल्ह्यातील या बाजारात केवळ 38 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे पिवळ्या दर्जाच्या सोयाबीनला किमान 4,250 रुपये तर कमाल 4,475 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर 4,350 रुपये इतका राहिला. कमी आवक आणि दर्जेदार मालामुळे किनवट बाजारात दर तुलनेने उंचावलेले दिसून आले.

राजूरा बाजार समिती : चंद्रपूर जिल्ह्यातील या बाजारात 70 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान 3,600 रुपये तर कमाल 4,355 रुपये प्रति क्विंटल दर नोंदवण्यात आला. सर्वसाधारण दर 4,280 रुपये इतका राहिला.

काही प्रमाणात कमी प्रतीचा माल आल्याने किमान दरात फरक दिसून आला असला, तरी दर्जेदार सोयाबीनला समाधानकारक भाव मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान राज्यातील सोयाबीन बाजारात सध्या दर स्थिर असून, पुढील काळात आवक आणि मागणीवरच भावांची दिशा ठरणार असल्याचे बाजार अभ्यासकांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News