Soybean Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक. याची लागवड मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात केली जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही काळापासून हे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे.

मात्र या हंगामात सोयाबीनला काही ठिकाणी चांगला दर मिळतो. हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा जास्त दराने विकले गेले.
यानंतर मात्र सोयाबीन बाजार पुन्हा दबावत आला. आजही राज्यातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात चढ उतार पाहायला मिळाली.
दरम्यान आज आपण राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत.
इथे मिळतोय सोयाबीनला सर्वाधिक दर
वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती : राज्यातील या बाजारात आज 2100 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली. या बाजारात आज सोयाबीनला किमान 4540 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला. तसेच इथे सोयाबीनला 6 हजार 35 रुपये प्रति क्विंटल असा कमाल आणि साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळाला.
चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3700 रुपये प्रति क्विंटल, कमाल पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4400 प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात सोयाबीनला किमान चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल, कमाल 5 हजार 85 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4455 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात पिवळ्या सोयाबीनला 4831 रुपये प्रति क्विंटल असा कमाल भाव मिळाला. तसेच या बाजारात सोयाबीनला किमान 3750 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4550 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळाला.













