Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक महत्त्वाच पीक आहे. मात्र सोयाबीनला सध्या बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. गेल्या दोन अडीच वर्षांपासून हे एक शेतकऱ्यांना परवडत नाही आणि म्हणूनच यावर्षी अनेकांनी सोयाबीनची लागवड करण्याला पसंती दाखवलेली नाही.
शेतकरी बांधव आता सोयाबीन ऐवजी इतर पिकांना प्राधान्य दाखवत आहेत. हेच कारण आहे की या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र प्रचंड कमी झाले आहे आणि यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे अतिवृष्टीमुळे देखील सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे आणि याचाही उत्पादनावर परिणाम होणार आहे. दरम्यान या सगळ्या परिस्थितीत आता सोयाबीनला डिसेंबर अखेरपर्यंत काय भाव मिळू शकतो जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत सोयाबीनचे भाव कसे असतील असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत असून या संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे.
सध्या स्थितीला सोयाबीनचा सरासरी बाजार भाव हा 4000 रुपये प्रति क्विंटल ते 4500 प्रतिक्विंटल च्या दरम्यान स्थिरावलेला दिसतो. काही ठिकाणी यापेक्षा कमी तर काही ठिकाणी अपेक्षा थोडा जास्त भाव मिळतोय. त्यामुळे आता डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी भाव किती मिळणार, सोयाबीनच मार्केट कसं असणार हा मोठा प्रश्न आहे.
सोयाबीनचे उत्पादन कसे राहिले आहे?
यंदा भारतात सोयाबीनचे उत्पादन 100 लाख टन च्या आसपास राहणार असा अंदाज आहे. मागील वर्षाची तुलना केली असता उत्पादनात जवळपास 21 टक्क्यांची कपात होईल असे दिसते. विशेष म्हणजे जागतिक सोयाबीन उत्पादन सुद्धा यावर्षी 0.3% पर्यंत घसरणार असे समोर आले आहे.
ही सगळी परिस्थिती पाहता या वर्षी सोयाबीनचे दर थोडे तरी तेजीत राहणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात चढ-उतार सुरू आहेत.
या महिन्यात सोयाबीनला काय दर मिळणार
केंद्रातील सरकारने या हंगामासाठी सोयाबीनचा हमीभाव म्हणजेच किमान आधारभूत किंमत 5,328 रुपये प्रति क्विंटल एवढी निश्चित केली आहे. मात्र या महिन्यात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा कमी राहणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खरेतर मागील तीन वर्षांत डिसेंबर महिन्यातील सरासरी सोयाबीन दर सातत्याने कमी होत राहिले आहेत. डिसेंबर 2022 मध्ये सोयाबीनला सरासरी 5 हजार 556 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता. तसेच डिसेंबर 2023 मध्ये सोयाबीनला सरासरी 4,831 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला होता.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सरासरी 4,143 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये सोयाबीनला सरासरी 4515 पासून ते 4895 प्रतिक्विंटल पर्यंतचा बाजारभाव मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजेच या वर्षी डिसेंबर महिन्यात सोयाबीन 6000 रुपयांचा टप्पा गाठणार नसल्याचे अंदाजवरून क्लिअर होत आहेत. यामुळे आता येत्या काळात सोयाबीनला काय भाव मिळणार? हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.













