Soybean Rate : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सोयाबीनच्या बाजारभावात आज पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळाली असून यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधान दिसत आहे. सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लागवड केली जाते. याची लागवड राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते.

या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असून गेल्या काही काळापासून या पिकाची लागवड करणाऱ्यांना अपेक्षित परतावा मिळत नसल्याने शेतकरी बांधव चिंतेत आहेत.
पण यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळणार अशी अपेक्षा आहे. कारण म्हणजे यावर्षी देशांतर्गत आणि जागतिक सोयाबीन उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.
सोयाबीनचे रेट सतत दबावात असल्याने यावर्षी देशातील दोन्ही प्रमुख राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र थोडेसे कमी झाले आहे आणि याचाच फटका उत्पादनाला बसणार असे बोलले जात आहे.
दरम्यान , आज राज्यातील काही बाजारांमध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. पिवळ्या सोयाबीनला आज वाशिमच्या मार्केटमध्ये सर्वाधिक दर मिळाला.
सोयाबीनला कुठ मिळाला सर्वाधिक भाव
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार 250 रुपये असा कमाल भाव मिळाला आहे. त्याचवेळी सरासरी पाच हजार आठशे रुपये आणि किमान 4015 रुपये असा दर येथे नमूद करण्यात आला.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : मिळालेल्या माहितीनुसार आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला 5 हजार 200 रुपये असा कमाल भाव मिळाला आहे. त्याचवेळी सरासरी 4 हजार 400 रुपये आणि किमान 3600 रुपये असा दर येथे नमूद करण्यात आला.
बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला 4 हजार 825 रुपये असा कमाल भाव मिळाला आहे. त्याचवेळी सरासरी 4 हजार 201 रुपये आणि किमान 3501 रुपये असा दर येथे नमूद करण्यात आला.
धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिवळ्या सोयाबीनला 4 हजार 750 रुपये असा कमाल भाव मिळाला आहे. त्याचवेळी सरासरी 4 हजार 200 रुपये आणि किमान 3500 रुपये असा दर येथे नमूद करण्यात आला.













