वर्ल्ड कप फायनल मॅचसाठी रेल्वेकडून स्पेशल ट्रेनची व्यवस्था ! कोठून , कस जायचं ? जाणून घ्या सर्व माहिती

Published on -

World Cup : सध्या वर्ल्ड कपचा फिवर चांगलाच तेजीत आहे. सध्या क्रिकेटप्रेमी वर्ल्ड कपच्याच नशेत आहेत. आता यावर आनंदाचा कहर असा आहे की, भारताचा संघ फायनल मध्ये गेलाय. येत्या रविवारी 19 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांमध्ये हा सामना रंगणार आहे.

त्याच्या आधीच कोण जिंकणार याचे आखाडे बांधण्यास सुरवात झालीये. परंतु या सामन्याचे एक विशेष महत्वही असणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान, तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे तीन दिग्गज असणार आहेत.

त्यामुळे आता याला विशेष महत्व प्राप्त झालय. परंतु खरी गोची झाली होती ती या सामन्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांची. कारण विमान तिकिटांचे वाढलेलं दर व इतर गोष्टी पाहता ते शक्य होत नव्हते. परंतु आता या सर्वांसाठी खुशखबर आहे. रेल्वेने विश्वचषकासाठी स्पेशल ट्रेनची घोषणा केली आहे.

* असे असणार आहे नियोजन

रेल्वे ही सर्वसामान्यांची लाईफलाईन आहे. सुरक्षित व स्वस्त प्रवास असल्याने अनेकांना ते परवडते देखील. आता रेल्वेने खास नियोजन केलं आहे. विश्वचषक फायनलसाठी सीएसएमटी-अहमदाबाद स्पेशल एक्सप्रेस ट्रेन (01153) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 18 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 10.30 वाजता सुटेल.

ही ट्रेन दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी पावणेसात वाजता अहमदाबादला पोहोचेल अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर अहमदाबाद-छत्रपती शिवाजी महाराज स्पेशल एक्स्प्रेस ट्रेन (01154) अहमदाबादहून 20 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी पावणेदोन वाजता तेथून निघेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.

त्यामुळे आता वर्ल्ड कप पाहणाऱ्यांची मस्त सोय होणार आहे. तसेच वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ट्रेन (09011) वांद्रे टर्मिनस स्थानकावरून 18 नोव्हेंबरला रात्री पावणेबारा वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 7.20 वाजता अहमदाबादला पोहोचेल अशी माहिती प्रशासनाने दिलीये.

* असं करा तिकीट बुकिंग

ट्रेन क्रमांक 01153/01154 साठी तिकीट बुकिंग 18 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. रेल्वे तिकिटांचे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर केले जाईल. त्यामुळे ज्यांना वर्ल्ड कप फायनल पाहायला जायचे आहे त्यांच्यासाठी अत्यंत उत्तम सोय रेल्वे मार्फत झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News