महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेला लागणार 10वी, 12वी बोर्डाचा निकाल

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर, दहावी आणि बारावीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान आता बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या संदर्भातच एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

Published on -

SSC And HSC Result Date : महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.

विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकांच्या माध्यमातूनही दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार असावा उपस्थित केला जातोय. अशातच आता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट हाती आली आहे. बोर्ड परीक्षेचे निकाल नेमके कधीपर्यंत जाहीर होणार याचसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

कधी जाहीर होणार निकाल ?

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अद्याप दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या अधिकृत निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांवर विश्वास ठेवला तर निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल लवकर जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो, तर दहावीचा निकाल त्यानंतर दहा दिवसांत जाहीर केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. फेब्रुवारी ते मार्च 2025 या कालावधीत पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातील सुमारे 15 लाख विद्यार्थी उपस्थित होते.

परीक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणीला वेगाने सुरुवात करण्यात आली होती आणि आता निकाल ऑनलाइन जाहीर करण्याच्या प्रक्रियेला अंतिम रूप दिले जात आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल नेमका कधी जाहीर होणार? याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

अजून बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी देखील येत्या काही दिवसांनी लवकरच रिझल्टची तारीख डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. आता आपण तारीख डिक्लेअर जाहीर झाल्यानंतर निकाल कसा चेक करायचा? याबाबत माहिती पाहणार आहोत.

निकाल कसा चेक करणार?

10 वी अन 12 वी च्या विद्यार्थ्यांना रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आपला निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. निकाल पाहण्यासाठी आसन क्रमांक आणि विद्यार्थ्यांच्या आईचे नाव टाकावे लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तो ऑनलाइन पाहता येणार असून, त्याची प्रिंट काढण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe