SSC Board Result : राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागणार ? याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला.
बारावीचा निकाल पाच मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. विद्यार्थी सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून दहावीचा निकाल अखेर कार कधी जाहीर होणार असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर कोण कोणत्या साईटवर निकाल पाहता येईल याबाबतची आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर दहावीच्या विद्यार्थ्यांना फक्त एक-दोन साइट्सवर निकाल पाहता येणार नाहीयेत, तर तब्बल नऊ वेबसाईटवर निकाल पाहता येतील.
कधी जाहीर होणार दहावीचा निकाल?
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल हा 15 मे 2025 च्या आधीच जाहीर होणार आहे. 13 मे 2025 ते 15 मे 2025 या काळात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता अधिक असल्याचे म्हटले जात आहे.
खरे तर बारावीचा निकाल जाहीर पुण्यात राज्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावी बोर्डच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे निकाल यंदा 15 मे च्या आधीच जाहीर होणार आहेत.
यानुसार बारावीचा निकाल पाच मे ला जाहीर झाला आहे आणि आता पंधरा मे च्या आत दहावीचा निकाल लागेल. यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या आणि यामुळे निकाल सुद्धा लवकर लागतोय.
दहावीचा निकाल कुठे पाहता येणार?
राज्य बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या 9 वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. आम्ही आता सांगू इच्छितो की राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण
या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीचा निकाल वेगवेगळ्या वेबसाईटवर जाहीर केला जाणार आहे. mahasscboard.in या राज्य बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच विद्यार्थ्यांना एकूण 9 वेबसाईटवर निकाल पाहता येईल.
2)https://hscresult.mkcl.org
3)https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hse-12-results
4)https://www.indiatoday.in/education-today/results
5)https://www.aajtak.in/education/board-exam-results
6)https://results.digilocker.gov.in
7)https://results.targetpublications.org
9)https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
आम्ही वर सांगितलेल्या या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.