एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरातून शिर्डी आणि शेगाव साठी सुरू होणार नवीन बससेवा, वाचा सविस्तर

एसटी महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महामंडळाकडून एक नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र शेगाव आणि श्रीक्षेत्र शिर्डी येथे दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी ही नवीन गाडी आजपासून सुरू करण्यात येणार आहे.

Published on -

ST Bus Service : एस टी महामंडळाच्या लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी महामंडळाने श्रीक्षेत्र शिर्डी आणि शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकरिता एक नवीन बस सेवा सुरू केली आहे. उपराजधानी नागपूर येथून नवीन बस सेवा सुरू होणार असून यामुळे नागपूरहून शेगावला आणि शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीत देवदर्शनासाठी जाणाऱ्या विदर्भातील नागरिकांना या नव्या बससेवेचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे. दरम्यान आता आपण नागपूर विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या नव्या बससेवेचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.

कसा असणार रूट?

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिक देवदर्शनाला निघतात. शेगाव आणि शिर्डीला देवदर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या देखील उल्लेखनीय आहे. नागपूर येथून दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक श्रीक्षेत्र शेगाव आणि शिर्डी येथे दर्शनासाठी जातात.दरम्यान हीच गोष्ट विचारात घेऊन आता नागपूर ते शिर्डी आणि शिर्डी ते नागपूर अशी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानची बस शेगाव मार्गे चालवली जाणार आहे.

कसे असणार वेळापत्रक?

एसटी महामंडळाचे नागपूर विभागाचे नियंत्रक विनोद चवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर – शिर्डी बस चार जून 2025 पासून आणि शिर्डी नागपूर बस 5 जून 2025 पासून चालवली जाणार आहे. ही बस सेवा नियमित राहणार आहे म्हणजे या मार्गावर दररोज बस चालवली जाणार आहे.या गाडीच्या टाईम टेबल बाबत बोलायचं झालं तर नागपुर मधून ही बस दररोज सकाळी सव्वा सहा वाजता रवाना होईल

आणि शेगाव येथे दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल, तसेच शिर्डी येथे रात्री साडेदहा वाजता पोहोचणार आहे.परतीच्या प्रवासात ही बस शिर्डी येथून पाच जून पासून दररोज सकाळी साडेसात वाजता रवाना होणार आहे, शेगावला सव्वाचार वाजता पोहोचणार आहे आणि नागपूर येथील बसस्थानकात रात्री अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचणार आहे.

तिकीट दर कसे राहणार?

या गाडीचे तिकीट दर कसे असतील याबाबत ही महामंडळाकडून माहिती समोर आली आहे. या गाडीचे नागपूर ते शिर्डी चे तिकीट 1 हजार 96 रुपये इतके असेल आणि नागपूर ते शेगावचे तिकीट 514 रुपयांचे असेल. या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्व प्रकारच्या सवलती लागू राहणार आहेत. ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना अशा सर्व सवलती या बससाठी लागू राहतील अशी माहिती महामंडळाकडून हाती आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!