St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांमागचं शुक्लकाष्ट काही संपेना..! 11 तारीख उजाडली, शासनाला वेतनाची आठवण पडाली, पेमेंट होणार का?

Ajay Patil
Published:
maharashtra news

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे वेतन हे सात ते दहा तारखेदरम्यान होत असते. कोरोनापूर्वी तर याच तारखेदरम्यान होत होते. मात्र तदनंतर महामंडळाचे बजेट कोलमडल्यामुळे वेतनासाठी शासनाच्या अनुदानावर अधिक अवलंबून राहावे लागत आहे.

यामुळे वेतन वेळेवर होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान आता डिसेंबर महिन्यातील वेतन 7 जानेवारी ते 10 जानेवारी दरम्यान होणे अपेक्षित होतं. मात्र आता 11 तारीख उजाडली तरीदेखील पेमेंट झाले नसल्याने कर्मचाऱ्यांमागील शुक्लकाष्ट काही संपत नसल्याचे चित्र आहे.

खरं पाहता गेल्यावर्षी वेतन वेळेवर होत नसल्याने आणि शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण केले जावे या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. विशेष म्हणजे या संपासाठी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी पाठींबा दिला होता.

आणि आजच्या घडीला भाजपा सत्तेत आले आहे मात्र तरीदेखील एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी कायमचं आहेत. संपादरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात गेले त्यावेळी न्यायालयात राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी घेतली होती. एसटी कर्मचाऱ्यांना 7 ते 10 तारखेदरम्यानचं कर्मचाऱ्यांना पेमेंट केलं जाईल असं न्यायालयात शासनाने सांगितलं होतं.

मात्र या वचनाची पूर्ती आता शासनाकडून होत नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर महिन्याचे वेतन 10 जानेवारीच्या आतचं करणे अपेक्षित होते मात्र आता 11 जानेवारीची दुपार झाली तरी देखील वेतनाचा थांगपत्ता नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधातील रोष वाढतच आहे.

वेतन वेळेवर होत नसल्याने कर्मचाऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे घराचे किंवा इतर कर्जाचे हप्ते थकत आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे वेळेवर वेतन करण्यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe