गणरायाच्या आगमनापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना गुड न्युज ! पगारात ‘इतकी’ वाढ होणार, संप मिटला

सरकारच्या या निर्णयानंतर अखेर कार कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तर आनंदाचे वातावरण आहेच शिवाय सर्वसामान्य जनतेने देखील सुटकेचा निश्वास घेतलाय. यामुळे आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपावर नेमका तोडगा कसा काढलाय याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Tejas B Shelar
Published:
ST Employee News

ST Employee News : एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी वाहतूक कोलमडली होती. गणपतीच्या दिवसांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावाला परतत आहेत. महत्त्वाचे म्हणजे एस टी महामंडळाकडून अतिरिक्त बसेस देखील चालवल्या जात आहेत. पण अशा या परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत होता.

मात्र या संपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या काही तासातच तोडगा काढण्यात यश मिळवले आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी काल अर्थातच चार सप्टेंबरला आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर अखेर कार कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तर आनंदाचे वातावरण आहेच शिवाय सर्वसामान्य जनतेने देखील सुटकेचा निश्वास घेतलाय. यामुळे आज आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपावर नेमका तोडगा कसा काढलाय याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांसमवेत महत्त्वाची बैठक घेतली. कालच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत संपावर तोडगा काढला जाणार होता. यानुसार शिंदे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.

तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात सहा हजार पाचशे रुपयांची सरसकट वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरेतर एसटी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून त्यांच्या पगारात सरसकट 5000 रुपयांची वाढ करायला हवी अशी मागणी केली जात होती.

पण, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार सरसकट 6500 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर 2021 मध्ये सेवाकाळानुसार अडीच हजार, चार हजार आणि पाच हजार अशी पगार वाढ मंजूर करण्यात आली होती.

मात्र या सदर नोकरदार मंडळीकडून त्यांना सरसकट पगार वाढ मिळायला हवी अशी मागणी जोर धरत होती. नुकत्याच पुकारलेल्या संपात हीच मागणी प्रमुख होती. दरम्यान, आता सरकारने संबंधित नोकरदार मंडळीची ही मागणी पूर्ण केली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये ज्यांना 5 हजार रुपयांची वाढ मिळाली होती त्यांच्या पगारात आता दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 2021 ला ज्यांना चार हजार रुपयांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात अडीच हजारांची वाढ झालीये. ज्यांना अडीच हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारात आता 4 हजार रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe